आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२५ मजली इमारतीइतक्या उंचीवर सर्फिंग, धक्कादायक स्टंटचा व्हिडिओ जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - स्टंट करणे हे एक तर एखाद्याच्या प्रोफेशनशी जुळलेले असते किंवा एखाद्याला त्यात खूप रस असतो. या दोघांना जीव धोक्यात निश्चित टाकावा लागतो. पूर्ण विश्वात फटका मारणारा इंग्लंडचा नावाडी अॅलेक्स थॉमसनसुद्धा आपल्या धक्कादायक स्टंटसाठी ओळखला जातो. ४१ वर्षीय थॉमसनने नुकताच एक व्हिडिओ जाहीर केला आहे. हा व्हिडिओ बघून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. यात तो समुद्रात आपल्या सेलबोटच्या मदतीने जबरदस्त सर्फिंग करताना दिसतो. समुद्रात २८० फूट म्हणजे २५ मजली इमारतीइतक्या उंचीवर सर्फिंग करून त्याने जगभरातील सर्वांना जणूकाही आव्हानच दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्टंटच्या वेळी त्याने सूट आणि टाय घातलेले आहे. त्याने हा स्टंट पोर्तुगालच्या एलगार्व समुद्रकिनाऱ्यावर केला.

सर्फिंगमध्ये ३५ लोकांची मदत
या स्टंटसाठी थॉमसनला नौकानयनाची अद््भुत क्षमता कामी आली. त्याने स्वत:ला दोरीच्या मदतीने सेलिंग बोटच्या ६० फूट उंचीवर बांधून नावेचा पाठलाग केला. यानंतर बोटच्या स्पीडची मदत घेताना त्याने सलगपणे उंची गाठली. यादरम्यान त्याने संतुलन बिघडू नये म्हणून बोटवर कंट्रोल ठेवले. त्याच्या या नव्या स्टंटमध्ये जवळपास ३५ लोकांची मदत झाली. यात काइट सर्फर सुसी मेशिवाय सर्फिंग कोच रे कॅस्पर यांचा समावेश आहे. थॉमसन आता या वर्षी नोव्हेंबरमध्ये ओशन माल्टर्स रेस कॅलेंडर, "द वेंडी ग्लोब'मध्ये सहभागी होईल. या सोलो नॉनस्टॉप रेसला जिंकण्याचा विश्वास त्याला आहे. २०१२-१३ मध्ये या प्रतिष्ठेच्या सोलो मॅरेथॉनला ८० दिवस १८ तास २३ मिनिटांत पूर्ण करून त्याने तिसरे स्थान मिळवले होते.
बातम्या आणखी आहेत...