आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIRAL VIDEO: सानिया थिरकली शोएबसंगे, जल्‍लोषात साजरा केला पाकचा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या बॉलीवुडच्‍या गाण्‍यावर भारताची टेनिसस्‍टार सानिया मिर्झा हिने पाकिस्‍तान क्रिकेट टीमसोबत सोमवारी मनसोक्‍त डान्‍स्‍ा केला. पाकिस्‍तान संघाच्‍या विजयाच्‍या जल्‍लोषात ती सहभागी झाली होती. या डान्सचा व्‍हिडीओ आणि फोटो तिने ट्विटरवर अपलोड केले आहेत.
कोलंबोमध्‍ये पाकिस्‍तानी टीमने तिस-या वनडे क्रिकेट सामन्‍यात श्रीलंकेच्‍या टीमला 135 धावांनी पराभूत केले. 'या विजयाचा जल्‍लोष आम्‍ही साजरा करत आहे.' असे ट्विटही सानियाने केले आहे. या व्‍हिडीओमध्‍ये सानिया तिचा पती शोएब मलिक आणि पाकच्‍या टीमसोबत डान्‍स करताना दिसत आहे.
पाकिस्‍तानने केल्‍या 316 धावा
पाकिस्तानने तीस-या वनडे मध्‍ये यजमान श्रीलंकेला 135 धावांनी पराभूत केले आहे. पाकिस्तानने सुरूवातीला फलंदाजी करताना चार गडी बाद 316 धावा केल्‍या. त्‍यामध्‍ये सरफराज अहमदने 77 आणि हफीज ने 54 धावा बनवल्‍या. प्रत्‍युत्‍तरात श्रीलंकेची टीम 41.1 षटकांमध्‍ये केवळ 181 धावा करू शकली.

पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, सानिया, शोएबच्‍ाा डान्‍स आणि शेवटच्‍या स्‍लाईडवर व्‍हिडीओ..