आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेवेदरच्या पावलावर पाऊल टाकणार विजेंदर, प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये आजमावणार नशीब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: ऑलिंपिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंहने मेवेदरप्रमाणेच आता प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये नशीब आजमवायचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने भारतीय बॉक्सिंगमधून संन्यास घेण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. भारतीय बॉक्सिंगमधून संन्यास घेतल्यानंतर, तो ब्रिटिश प्रमोटर फ्रान्सिस वॉरेनसाठी खेळणार आहे.
काय आहे नेमके कारण?
प्रो-बॉक्सिंगमध्ये अॅम्याचूर बॉक्सिंगच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. नुकत्याच फ्लॉयड मेवेदर आणि पॅकियाओ यांच्या दरम्यान झालेल्या बॉक्सिग सामन्यात कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची खैरात वाटण्यात आली. या संदर्भात भारतीय बॉक्सिंगचा एक अधिकारी म्हणाला, "विजेंदर अॅम्याचूर बॉक्सिंगपासून बरेच काही शिकला आहे. असेही असू शकते की, तो निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता आणि करिअर चांगले करण्यासाठी प्रयत्न करत असेल. प्रोफेशनल बॉक्सिंगमधे तो मोठ्या प्रमाणावर पैसा कमवू शकतो. जर फीट राहिला तर आणखीही पाच- सहा वर्षांपर्यंत तो खेळू शकतो.

ऑलिंपिकच्या तयारीला बसू शकतो फटका
विजेंदर सिंहने प्रो-बॉक्सिंग खेळायचे ठरवले तर, तो भारताच्या बाजूने ऑलंपिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. खेळ मंत्रालयाच्या 'टारगेट ऑलिंपिक 2016 पोडियम स्कीम' या योजनेचा विजेंदरदेखील एक भाग आहे. या योजने अंतर्गत 13 जुलैपासून प्रशिक्षणवर्गदेखील सुरू होत आहे.

विजेंदर सिंहने कॉमनवेल्थ गेम्समध्ये (3 मेडल), एशियन गेम्समध्ये (2 मेडल) तर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिकमध्ये प्रत्येकी एक-एक मेडल जिंकले आहे. तो भारताचा सर्वात यशस्वी बॉक्सर आहे. 2009 मध्ये त्याला जगातील पहिल्या क्रमांकाचा मिडलवेट
बॉक्सर (75 किलोग्राम वर्ग) घोषित करण्यात आले होते.

29 जूनला होऊ शकते घोषणा
वॉरेनचे मिडिया टीम मॅनेजर रिचर्ड मेनार्ड यांनी याबाबतीत संकेत दिले आहेत की, विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सिंगमधे पर्दापण करू शकतो. मेनार्ड यानी सांगितल्याप्रमाणे "29 जूनला बॉक्सिंग प्रमोटर फ्रान्सिस वॉरेन एका पत्रकार परिषदेत ऑलिंपिक - 2008 मध्ये कांस्यपदक विजेता विजेंदरच्या बाबतीत एक मोठी घोषणा करू शकतात.
29 वर्षांचा विजेंदर आशियातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या संदर्भात सोमवारी येणारी बातमी, ही त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरणार आहे. विजेंदर हा प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणारा पहिलाच भारतीय बॉक्सर नसेल. या आधी सिडनी ओलिंपिक-2000 मध्ये चौथ्या स्थानावर राहिलेला गुरुचरणसिंग नागरानेदेखील ऑलिंपिकनंतर लगेचच प्रोफेशनल बॉक्सर म्हणून कारकिर्दीला सुरूवात केली होती.
क्विंसबेरी आहे विजेंदर
भिवानीचा हा धुरंधर बॉक्सर वॉरेन यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या क्विंसबेरी प्रमोशन्समध्ये प्रशिक्षणासाठी गेला आहे. तो, पटियाला येथे असलेल्या नॅशनल कँपमधून 25 जून ते 12 जुलैपर्यंत सुटीवर आहे. लंडन येथे जाण्याआधी विजेंदरने राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक गुरुबक्शसिंग संधू यांना लिहिले होते की, "मी, येणाऱ्या आगामी एका लिगमध्ये भाग घेणार आहे. त्यासाठी स्वः खर्चाने क्विंसबेरी प्रमोशन्स येथे प्रशिक्षणासाठी जात आहे. 13 जुलै रोजी मी परत नॅशनल कँपमध्ये दाखल होईल." विजेंदरला 14 जुलै रोजी पटियाला येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपच्या ट्रायल्समध्येदेखील भाग घ्यायचा आहे.
बॉक्सिंग फेडरेशनच्या बैठकीत चर्चा
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनच्या 'अॅड हॉक कमिटी'ची पहिली बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विजेंदरच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल इंजेती श्रीनिवास यांनी विजेंदरच्या यूके प्रवासाच्या संदर्भात फार चांगल्या अपेक्षा ठेऊ नये असे म्हटले आहे. संधू म्हणाले की, विजेंदरने मला केवळ यूकेला ट्रेनिंगसाठी जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र मला त्याच्या प्रो-लीगसंदर्भात कसलीही माहिती नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, विजेंदरने यूके ट्रिपमध्ये प्रो बॉक्सर्स सोबत शेअर केलेले काही फोटोज...