आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Vikas Gowda Qualifies For Rio Olympics After Revision Of Entry Standards

विकास गौडाला रिओ ऑलिम्पिकचे तिकीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा स्टार थाळीफेकपटू विकास गौडाने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या मैदानी क्रीडा प्रकारात जास्तीत जास्त खेळाडूंचा समावेश करण्यासाठी घेतलेल्या निर्णयानंतर पात्रतेसाठीचे नियम कमी केले. त्याचा फायदा गौडाला मिळाला.

गेल्या एप्रिल महिन्यात आयएएएफच्या नियमाप्रमाणे पुरुष थाळीफेक प्रकारात पात्रता मिळवण्यासाठी ६६ मीटर ठेवण्यात आले होते. आयएएएफने हे अंतर कमी करत ६५ मीटरवर आणले. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णविजेता विकासने ६५.१४ मीटर लांब थाळी फेकली हाेती. त्यासाठी तो पात्र ठरला.
बातम्या आणखी आहेत...