आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानवर चर्चा चुकीची, नेहमी तेच प्रश्न विचारले जातात आणि तेच उत्तर मिळते: कोहली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चॅम्पियन्स ट्रॉफीला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाने सचिनचे बायोपिक ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ पाहिले. या वेळी कोहली आणि अनुष्काने सचिन-अंजलीची भेट घेतली. - Divya Marathi
चॅम्पियन्स ट्रॉफीला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाने सचिनचे बायोपिक ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ पाहिले. या वेळी कोहली आणि अनुष्काने सचिन-अंजलीची भेट घेतली.
मुंबई- आम्ही आमचा किताब वाचवण्यासाठी तयार आहोत, असे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले. पहिल्यांदा आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत नेतृत्व करणाऱ्या कोहलीने म्हटले की, ‘आयपीएलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार आहेत. आयपीएल सर्वांसाठीच सरावासारखे होते.  आमच्यावर गतचॅम्पियन असल्याचा दबाव असेल. मात्र, हा दबाव मागे टाकावा लागेल.’  

पाकिस्तानविरुद्ध ४ जून रोजी होणाऱ्या सामन्याबाबत कोहली म्हणाला, ‘यावर अधिक चर्चा चुकीची आहे. आम्ही पहिल्यांदा  पाकिस्तानसोबत खेळणार आहोत, असे नाही.  नेहमी तेच प्रश्न विचारले जातात आणि नेहमी तेच उत्तर मिळते. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी दबाव असतो. मात्र, आम्ही सामान्यपणे खेळू.’  मी या महत्त्वपूर्ण स्पर्धेत नेतृत्व करत असल्याचा मला अभिमान आहे, असे यावेळी त्याने म्हटले.

धोनी, युवीला आदेश देऊ शकत नाही
धोनी, युवी दोघे संघाचे सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. या दोघांना मी आदेश देऊ शकत नाही. परिस्थितीनुरूप बदल करण्यात ते सक्षम आहेत. त्यांनी खुलून खेळ केला तर संघाच्या आत्मविश्वासासाठी ते उपयुक्त ठरेल.   
 
 
बातम्या आणखी आहेत...