आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया कानपूरात,विराट, अश्विनने कापला केक; हॉटेलची कसून तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूरचे हॉटेलमध्ये विराट कोहली आणि आर. अश्विन. - Divya Marathi
कानपूरचे हॉटेलमध्ये विराट कोहली आणि आर. अश्विन.
कानपूर- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 22 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये सुरु होण-या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ दाखल झाला आहे. भारतीय संघासाठी ही कसोटी अतियश महत्त्वाची आहे कारण ही भारताची 500 कसोटी आहे. याच कारणामुळे या मॅचला स्पेशल बनविण्यासाठी बीसीसीआयकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच या तयारीदरम्यान एक छोटेसे सेलिब्रेशनही हॉटेल लँडमार्कमध्ये पार पडले. टीम इंडिया याच हॉटेलात उतरली आहे. जेथे 500 कसोटी खेळण्यासाठी पोहचलेल्या संघाने केक कापला. कर्णधार विराट कोहलीने केक कापला. दुसरीकडे, याच दिवशी आर. अश्विनचा बर्थडे असल्याने त्याचाही केक कटिंग सेरेमनी पार पडला. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया शनिवारी सायंकाळी कानपूर पोहचली.
हॉटेल लँडमार्कची कसून तपासणी-
- भारतीय संघ येथे 500 वी कसोटी खेळेल. यासाठी अनेक वेगवेगळे कार्यक्रम ठेवले आहेत.
- तसेच हा कार्यक्रम यादगार करण्यासाठी बीसीसीआय मोठे प्रयत्न करीत आहे.
- याचाच भाग म्हणून बीसीसीआयने आजी-माजी कर्णधारासह अनेक क्रिकेटर्स, सेलिब्रेटिज यांना पाचारण केले आहे.
- त्यामुळे कानपूरमध्ये पुढील काही दिवस बड्या लोकांची वर्दळ राहणार आहे.
- काही घातपात होऊ नये, सुरक्षेत त्रुटी राहू नये म्हणून रविवारी कानपूरमधील हॉटेल लँडमार्कची कसून चौकशी, तपासणी करण्यात आली.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कसे राहिले हे सेलिब्रेशन...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...