आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वनाथन अानंद विजयी ट्रॅकवर; बाेरिसचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माॅस्काे - पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन अानंद रविवारी ताज मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत विजयी ट्रॅकवर अाला अाहे. त्याने पाचव्या फेरीत माजी वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजर बाेरिस गालफांडचा पराभव केला. यासह त्याला स्पर्धेत दमदार पुनरागमन करता अाले. अाता त्याच्या नावे स्पर्धेत एकूण ३ गुण झाले अाहेत.

दुसरीकडे हाॅलंडच्या अनीश गिरीची सलग विजयाची मालिका खंडित झाली. त्याची रशियाच्या इयानविरुद्ध लढत अनिर्णीत राहिली. गिरीच्या नावे ४ गुण अाहेत. तसेच अार्मेनियाच्या लेवाेन अाराेनियनने लढतीमध्ये रशियाच्या व्लादिमीर क्रमानिकला बराेबरीत राेखले.
बातम्या आणखी आहेत...