आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकामुराविरुद्ध लढत ड्राॅ; आनंदचे तिसरे स्थान कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेवेगर - पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने नाॅर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आपले तिसरे स्थान कायम ठेवले. त्याने साेमवारी झालेल्या स्पर्धेतील पाचव्या फेरीतला आपला पराभव यशस्वीपणे टाळला. भारताच्या आनंदने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला बराेबरीत राेखले. यासह त्याने गुणतालिकेतील स्थान कायम ठेवले. त्याचा स्पर्धेतील हा चाैथा सामना बराेबरीत राहिला. गत सामन्यात आनंदने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला पराभूत केले हाेते.

पाचव्या फेरीतील रंगतदार लढतीमध्ये अमेरिकेच्या खेळाडूने विजयासाठी जाेरदार प्रयत्न केला. मात्र, आनंदने सरस चालीच्या बळावर सामन्याला कलाटणी दिली.
बातम्या आणखी आहेत...