आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम पायाच्या फॅक्टरीचा वार्डीने केला दाैरा; लिस्टर सिटी 2015-16 मध्ये चॅम्पियन टीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेफील्ड- इंग्लंडचा सुपरस्टार स्ट्रायकर जेमी वार्डी यांचा फुटबाॅलच्या विश्वातील संघर्षमय प्रवास अाता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार अाहे. यासाठी ते लवकरच ‘द नेक्स्ट जेमी वार्डी’ हा चित्रपट घेऊन येणार अाहेत. यामध्ये त्यांनी अापले बालपण, संघर्ष अाणि फुटबाॅलच्या विश्वातील अापल्या यशावर खास फाेकस टाकला अाहे. या चित्रपटासाठी त्यांनी कृत्रिम पाय तयार करणाऱ्या एका फॅक्टरीला भेट दिली. तारुण्यात असताना त्यांनी या ठिकाणी कृत्रिम पाय तयार करण्याचे काम केले हाेते. यामध्येही या कामाचे चित्रीकरण करण्यात अाले अाहे. यामधून युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.   
 

जेमी वार्डी हे गत २०१५-१६ च्या चॅम्पियन्स लीग चॅम्पियन ठरलेल्या लिस्टर सिटी क्लबचे सदस्य खेळाडू अाहेत. या स्पर्धेदरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. त्यांनी या स्पर्धेदरम्यान सलग ११ सामन्यांत गाेल करून सर्वांचे लक्ष वेधले हाेते.   
‘या इथपर्यंतचा माझा प्रवास हा अधिक संघर्षमय राहिलेला अाहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातील प्रवेशासाठी करावा लागणारा संघर्षही अधिक खडतर हाेता. दरम्यान, मला वयाच्या १६ व्या वर्षी क्लब शेफील्ड वेडनसडेने नाकारले हाेत. कमाईचे काेणतेही साधन माझ्याकडे नव्हते. तसेच फुटबाॅल खेळण्याचेही माेठे स्वप्न हाेते. शेवटी मला कार्बन फायबर फॅक्टरीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी कृत्रिम पाय तयार करतात. यासाठी मी बारा तास काम करत हाेताे. त्यानंतरही  नित्यनेमाने स्टाॅकब्रिज पार्ककडून नाॅन लीग फुटबाॅलमध्ये खेळत हाेताे.  अाठवड्याला अडीच हजाराचे वेतन मिळत  हाेते. काही सामन्यांमध्ये मी  ६० मिनिटेच खेळू शकत हाेताे.  घरी जाण्यासाठी अावश्यक असलेली गाडी पकडावी लागत हाेती, असेही त्यांनी  सांगितले.
बातम्या आणखी आहेत...