आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Warriors Visit Cavaliers Seeking End To 40 year NBA Title Drought

कॅवेलियर्सविरुद्ध वाॅरियर्स टीम विजयी; स्टीफन ठरला विजयाचा शिल्पकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाॅकलंड- वाॅरियर्स टीमने एनबीएमध्ये धडाकेबाज विजयासह ३-२ ने अाघाडी घेतली अाहे. वाॅरियर्सने पाचव्या सामन्यामध्ये कॅवेलियर्सला माेठ्या फरकाने धूळ चारली. या टीमने १०९-९१ ने सामना जिंकला. यासह टीमने अाता अाघाडी मिळवली अाहे. अाता सहाव्या सामन्यात दाेन्ही संघांमध्ये चुरस रंगण्याची शक्यता अाहे. कॅवेलियर्सच्या टीमसाठी हा सामना अधिक महत्त्वाचा अाहे. दुसरीकडे वाॅरियर्स टीम या सामन्यात बाजी मारून विजयी अाघाडी घेण्याच्या प्रयत्न असेल.
स्टीफन करीच्या शानदार खेळीच्या बळावर वाॅरियर्सने सामन्यात विजय मिळवला. त्याने संघाच्या विजयात सर्वाधिक ३७ गुणांचे याेगदान दिले. त्याने सात थ्री पाॅइंटसह एकूण ३७ गुणांची कमाई केली. वाॅरियर्सच्या स्टीफन करीला राेखण्यासाठी कॅवेलियर्सच्या मॅथ्यू डेलावेडाेवाने जाेरदार प्रयत्न केले. मात्र, त्याला समाधानकारक खेळी करता अाली नाही. ग्रीनने १६, अांद्रे इगुडाेलाने १४ व बारबाेसाने १३ गुणांची सामन्यामध्ये कमाई केली.

३-२ ने वाॅरियर्सची अाघाडी
१०९-९१ ने कॅवेलियर्सवर मात

थाॅमसनची खेळी व्यर्थ
कॅवेलियर्सचा सामन्यातील पराभव टाळण्यासाठी थाॅमसन अाणि जेअार स्मिथने केलेली चिवट खेळी व्यर्थ ठरली. यामध्ये थाॅमसनने १९ अाणि स्मिथने १४ गुणांचे याेगदान दिले. मात्र, त्यांना टीमला पराभवापासून राेखता अाले नाही.