आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Need To Get The Opening Goal In Matches: Indian Men's Hockey Team Coach Paul Van Ass

पेनल्टीसाठी मेहनतीची गरज : पाॅल, सेमीफायनलसाठी उत्सुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटवर्प- भारतीय हाॅकी टीममधील खेळाडुंना पेनल्टी काॅर्नरसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे टीमच्या कामगिरीचा दर्जा उंचावेल, असा विश्वास प्रशिक्षक पाॅल वान एेस यांनी व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हाॅकी संघ एफअायएचच्या वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलमध्ये सहभागी हाेणार अाहे. येत्या २० जूनपासून या सेमीफायनलला प्रारंभ हाेईल. या वेळी भारत अाणि फ्रान्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार अाहे. या सलामीच्या सामन्यासाठी अाशियाई चॅम्पियन भारतीय संघाचे खेळाडू अधिक उत्सुक अाहेत.

या सेमीफायनलच्या तयारीसाठी सराव सामन्याचे अायाेजन करण्यात अाले. या वेळी झालेल्या दाेन सराव सामन्यात भारताच्या टीमला संमिश्र यश संपादन करता आले. पहिल्या सामन्यात भारताने फ्रान्सला नमवले. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला यजमान बेल्जियमने २-१ ने धूळ चारली.

या स्पर्धेत एकूण संघ सहभागी होणार आहेत. या टीमची अ अाणि ब गटात विभागणी करण्यात अाली. भारतीय संघाचा स्पर्धेतील अ गटात समावेश कररण्यात आला.

जपानविरुद्ध भारतीय महिला पराभूत
एफआयएच वर्ल्ड हॉकी लीग सेमीफायनलची तयारी करत असलेल्या भारतीय महिला टीमला पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यात भारताला जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या जपानने पराभूत केले. जपानने २-० ने एकतर्फी विजयाची नोंद केली. रितू राणीच्या नेतृत्वाखाली महिला संघ मैदानावर उतरला होता.