आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Welterweight Title Mayweather Won When He Beat Pacquiao

मेवेदारकडून \'फाइट ऑफ द सेन्चुरी\' किताब घेतला परत, नाही दिले 1260 कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लॉयड मेवेदर - Divya Marathi
फ्लॉयड मेवेदर
मियामी - वर्ल्ड बॉक्सिंग ऑर्गनायझेशनने (WBO) नियम तोडल्या प्रकरणी फ्लॉयड मेवेदरचा 'फाइट ऑफ द सेन्चुरी' हा किताब परत घेतला आहे. वेल्टरवेट गटात त्याला वर्ल्ड चॅम्पियन घोषित करण्यात आले होते. त्यासोबत त्याला 200 मिलियन डॉलरचे (जवळपास 1260 कोटी रुपये) बक्षिस मिळाले होते, ते त्याने अद्याप परत केलेले नाही. त्यासाठी 3 जुलैची मुदत होती.
उत्पन्नाच्या बाबतीत जगातील अव्वल अॅथलिट असलेल्या मेवेदरने 2 मे रोजी फिलिपिन्सचा बॉक्सर मॅनी पकयाऊला 12 व्या राऊंडपर्यंत चाललेल्या जोरदार लढतीत पराभूत करत करकिर्दीतील 48 वा विजय साजरा केला होता. लास वेगास येथे झालेल्या या लढतीला फाइट ऑफ द सेन्चुरी म्हटले गेले होते.
का परत घेतला किताब
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या बॉक्सरला एकाच वजनी गटात सहभागी होता येते, मात्र मेवेदरने वेल्टवेटसह आणखी दोन वजनी गटात सहभाग नोंदवला होता आणि त्यात विजय देखील मिळविला होता. त्यामुळे त्याला किताब देता येणार नसल्याचे WBO ने म्हटले आहे. WBO च्या कमिटीने मेवेदरला त्याचा वजनीगट निवडण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत शुक्रवारी संपली होती. त्यानंतर बॉक्सिंग असोसिएशनने त्याला त्याचा वजनी गट निवडण्यासाठी 10 दिवसांचा वेळ दिला, त्यात तो यापुढे फाइट करु शकणार आहे.