आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • West Indies Batsman Dwayne Smith Has Announced His Retirement From All International Cricket.

रैनाच्या IPL टीमचा हा क्रिकेटर निवृत्त, जगतो अशी मनसोक्त पर्सनल लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेटर ड्वेन स्मिथने इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आहे. - Divya Marathi
वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेटर ड्वेन स्मिथने इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आहे.
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेटर आणि IPL टीम गुजरात लायन्सचा खेळाडू ड्वेन स्मिथने इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आहे. 33 वर्षाच्या स्मिथने याबाबतची घोषणा दुबईत पाकिस्तान सुपर लीगच्या क्वालिफाईंग फायनल मॅचच्या आधी केली. तो PSL मध्ये इस्लामाबाद यूनायटेड टीमकडून खेळतो. जबरदस्त राहिला होता डेब्यू...
 
- ड्वेन स्मिथने जानेवारी 2004 मध्ये दक्षिण अफ्रिकाविरूद्ध टेस्ट मॅच खेळताना आपला इंटरनॅशनल डेब्यू केला होता. 
- केपटाउनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये वेस्ट इंडिजकडून खेळताना त्याने दुस-या डावात शानदार शतक (नाबाद105) ठोकले होते.  
- स्मिथच्या खेळीमुळे ही मॅच ड्रॉ राहिली होती. यासोबतच अफ्रिकेत वेस्ट इंडिजचा सलग सातवा पराभव टळला होता. 
- मात्र, आपल्या शानदार डेब्यूनंतरही ड्वेन केवळ कसोटी क्रिकेटमध्ये नऊ कसोटीच खेळू शकला होता. 
- त्याने शेवटची टेस्ट मॅच मार्च 2006 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध खेळली होती. आपल्या टेस्ट करियरमध्ये त्याने एका शतकासह 320 धावा काढल्या होत्या. 
 
100+ वनडे खेळला- 
 
- ड्वेन स्मिथने आपल्या इंटरनॅशनल करियरमध्ये 105 वनडे (1560 रन) आणि 33 टी-20 (582 रन) मॅच खेळला. 
- स्मिथने वेस्ट इंडिजविरूद्ध शेवटची इंटरनॅशनल मॅच मार्च 2015 मध्ये खेळला होता. वनडे मॅचेसमध्ये त्याच्या नावावर 61 विकेट जमा आहेत.
- बार्बाडोसमध्ये राहणारा स्मिथ वेस्ट इंडिजकडून वर्ष 2007 आणि 2015 वर्ल्डकप टीमचा सदस्य होता. 
- वर्ष 2007 मध्ये वर्ल्डकपमधून वेस्ट इंडिज संघ लवकर बाहेर पडल्यानंतर स्मिथला सुमारे तीन वर्षे वनडे आणि टी-20 टीममधून बाहेर राहिला. 
- वर्ष 2010 मध्ये त्याने पुन्हा संघात स्थान मिळवले. तो 2007, 2012 आणि 2014 टी-20 वर्ल्डकपमध्ये आपल्या देशाच्या टीमचा सदस्य राहिला.
 
खेळत राहणार टी-20 लीग-
 
- इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतरही ड्वेन जगभरातील वेगवेगळ्या देशात होणा-या टी-20 लीगमध्ये खेळत राहील.
- ड्वेन IPL मध्ये गुजरात लायन्स टीममध्ये आहे. गेल्या सीजनमध्ये त्याने 12 मॅचेसमध्ये 324 धावा बनवल्या होत्या, सोबत 8 विकेट घेतल्या होत्या. 
- याशिवाय तो पाकिस्तान सुपर लीग, बांग्लादेश प्रीमियर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि इंग्लंडमधील नॅटवेस्ट ब्लास्ट लीगमध्ये खेळत राहील.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशी मस्तीभरी पर्सनल लाईफ जगतो ड्वेन स्मिथ...
बातम्या आणखी आहेत...