आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RIO : रशियासारखी कृपादृष्टी लाभली तरच नरसिंग खेळेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ - नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळू शकेल की नाही, याचे ठाम उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाडा आणि आयओसीने डोपिंगप्रकरणी जी कृपादृष्टी काही रशियन खेळाडूंबाबत दाखवली तशीच मेहेरनजर नरसिंगबाबत दाखवली तरच भारताचा हा कुस्तीपटू ऑलिम्पिक खेळण्याची शक्यता आहे. अन्यथा नरसिंगचा ऑलिम्पिक सहभाग कठीण होऊ शकतो.

नरसिंगबाबत अनिश्चितता कायमच : सुशीलकुमारला वगळल्यापासून नरसिंग यादवच्या पाठी शुक्लकाष्ठ लागले आहे. ऑलिम्पिक कुस्तीची सलामी तीन दिवसांवर आली असतानाही नरसिंग यादवला मानसिक शांतता नाही. तो रिओपर्यंत आला खरा; पण तो स्पर्धेत खेळू शकेल किंवा नाही याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे भारतीय गोटात अस्वस्थता आहे.

नाडाची चूक भोवणार ?
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी संस्थेने (नाडा) नरसिंग यादवला क्लीन चिट दिल्यानंतर तो अहवाल नाडाने २४ तासांत ‘वाडा’ या आंतरराष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी संस्थेकडे पाठवणे आवश्यक होते. मात्र, नाडाने तसे केले नाही. नाडाची ही चूक भारताच्या अंगलट येऊ शकते. नाडाने तो अहवाल लगेच दिला असता तर वाडानेही आपले म्हणणे लगेच स्पष्ट केले असते. मुळात नाडाने हा अहवाल दोन दिवसांपूर्वी वाडाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता वाडाने या संदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. नाडाच्या चुकीचा फटका नरसिंगला बसू शकतो.

आयओसीची मनधरणी करण्याचा प्रयत्न
रशियन खेळाडूंप्रमाणे नरसिंगला कृपादृष्टी मिळावी यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आता आयओसीची मनधरणी करणार आहेत. आयओएने नरसिंगप्रकरणी लगेचच निर्णय दिला होता. चूक नाडाची हाेती, असे आयओए सांगणार आहे.
बातम्या आणखी आहेत...