आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबी, व्यसनावर मात करून जेसन बनला नंबर वन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डब्ल्यूजीसी डेल मॅच प्ले जिंकल्यानंतर अापल्या कुटंुबीयांसमवेत जल्लाेष करताना जेसन डे. - Divya Marathi
डब्ल्यूजीसी डेल मॅच प्ले जिंकल्यानंतर अापल्या कुटंुबीयांसमवेत जल्लाेष करताना जेसन डे.
क्वीन्सलँड - सकाळी झाेपेतून उठल्यावर जेसन डे अशाप्रकारे मद्यधुंद झाल्यासारखा हाेता. त्याला रात्रीच्या वेळी घडलेले काहीही अाठवत नव्हते. यातूनच त्याची प्रगती खुंटली हाेती. यादरम्यान त्याचे वय अवघे १२ वर्षे हाेते. मात्र, अाजच्या घडीला २८ वर्षीय असलेला जेसन डे हा अाॅस्ट्रेलियातील नंबर वन गाेल्फपटू बनला अाहे.
जेसन डेच्या जन्माच्या वेळी कुंटुबीय हे ब्युडेसर्टमध्ये शेळ्याच्या गाेठ्यात राहत हाेते. सहा वर्षांचा जेसन झाल्यानंतर कुटुंबीयांनी क्वीन्सलँडमध्ये स्थलांतर केले. हे सर्व एका कसाईखान्यामध्ये राहू लागले. त्याचे वडील एल्विन हे एका कंपनीमध्ये काम करत हाेते. त्याचे वडील हे अधिकच रागीट स्वभावाचे हाेते. ते लहानसहान गाेेष्टीवरून जेसनला मारपीट करत असत. गरिबीच्या कारणामुळे त्याचे कुटुंबीय अधिकच हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत हाेते. त्यामुळेच त्याच्या वडिलांना मद्य सेवनाचे व्यसन जडले.

याचदरम्यान जेसनने गाेल्फ खेळणेही सुरू केले हाेते. ११ वर्षीय जेसनने सरावादरम्यान सुमार खेळी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या वडिलाने तब्बल तीन तास झाडाखाली जेसनला गटारामध्ये उभे केले हाेते. त्यानंतर मारपीट केली. जेसन १२ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.

त्यामुळे पैसे कमावण्यासाठी अाता जेसनलाही कंपनीमध्ये काम करावे लागत हाेते. मात्र, याचदरम्यान त्याने गाेल्फच्या सरावात कधीही खंड पडू दिला नाही. मात्र, चुकीच्या संगतीमुळे अाता त्यालाही मद्य सेवनाचे व्यसन जडले हाेते. मात्र, यादरम्यान टायगर वुड्सचे पुस्तक हे जेसनने वाचले. याच पुस्तकाने त्याच्या विचारात कमालीचा फरक पडला अाणि अापणही टायगर वुड्ससारखे हाेण्याचे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने मद्य प्राशन साेडून गाेल्फचा कसून सराव करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे िनश्चित केले. यातूनच त्याचे जीवनमान सुधारले. ताे स्थानिक स्पर्धांमध्येही सहभागी हाेऊ लागला. त्यामुळे ताे २००६ मध्ये प्राेफेशनल गाेल्फपटू बनला. दरम्यान, त्याने चांगली प्रगती साधली. मात्र, २०११ मध्ये सुमार कामगिरीमुळे त्याने अाता गाेल्फ साेडून देण्याचा विचार केला. मास्टर्स गाेल्फ स्पर्धेदरम्यान दुसऱ्या स्थानावर धडक मारल्यानंतर पुन्हा त्याचे मतपरिवर्तन झाले. त्याचा अात्मविश्वास द्विगुणित झाला. त्यानंतर त्याने सेंट अॅण्ड्रयू, कॅनडा अाेपन, बारक्लेज अाेपन, बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप जिंकली. तसेच २०१५ मध्ये जेसन हा पहिल्यांदा नंबर वन गाेल्फपटू बनला. त्यानंतर काही दिवस जाॅर्डन स्पिथ हा अव्वलस्थानी अाला. यंदाचा अॅरनाॅल्ड पाल्मर इन्व्हिटेशनल अाणि डब्ल्यूजीसी डेल मॅच प्ले जिंकून जेसन डे याने पुन्हा जागतिक गाेल्फच्या क्रमवारीत अव्वलस्थानावर धडक मारली अाहे.