आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारापोव्हाच्या वडिलांकडे नव्हते घर चालवायला पैसे, अशी बनली स्टार प्लेयर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारापोव्हाच्या बालपणीचा फोटो (डावीकडे) आणि सध्याचा फोटो (उजवीकडे). - Divya Marathi
शारापोव्हाच्या बालपणीचा फोटो (डावीकडे) आणि सध्याचा फोटो (उजवीकडे).
स्पोर्ट्स डेस्क - सुंदर टेनिस प्लेयर मारिया शारापोव्हा जगातील प्रसिद्ध प्लेयर्सपैकी एक आहे. पण एक काळ असाही होता, जेव्हा तिने गरीबीशी संघर्ष करून जीवन जगले होते. शारापोव्हाने सांगितले की, ती जेव्हा छोटी होती, तेव्हा तिच्या वडिलांची नोकरी सुटली होती. त्यानंतर एक काळ असाही आला जेव्हा घर चालवण्यासाठी त्यांच्याकडे केवळ 700 डॉलर शिल्लक होते. 

वडिलांनी केल्या छोट्या नोकऱ्या 
- शारापोव्हाने 12 सप्टेंबरला प्रकाशित होणाऱ्या तिच्या बायोग्राफीमध्ये याबाबत खुलासे केले आहे. ती म्हणते, 1991 मध्ये वयाच्या चौथ्या वर्षी मी चेनिस खेळायला सुरुवात केली होती. सहा वर्षाच्या वयापर्यंत मी चांगले टेनिस खेळायला लागले होते. पण तेव्हा आमच्याकडे अॅकेडमी जॉइन करण्यासाठी पैसे नव्हते. रशियात टेनिच्या फार सुविधा नव्हत्या. माझ्या वडिलांनी नोकरी सोडली आणि आम्ही अमेरिकेला गेलो. त्यावेळी वडिलांकडे फक्त 700 डॉलर होते. कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी ते छोटी छोटी कामे करायचे. 
- काही दिवसांनी मी एका टेनिस अकॅडमीत प्रवेश घेतला. मला स्कॉलरशिप मिळत होती. त्यामुळे मला खेळण्यासाठी मदत झाली. येथेच मी सेरेना आणि व्हीनस विल्यम्सला पहिल्यांदा पाहिले होते.  मी दोघींना प्रॅक्टीस करताना पाहायचे. त्यांना पाहून वाटायचे एक दिवस यांना हरवायचे आहे. याकाळात मी अॅमेचर टेनिस खेळत होते. नंतर 2001 मध्ये प्रोफेशनल टेनिस खेळायला सुरुवात केली. त्यानंतर प्राइज मनी मिळायला लागले. 

पुढे वाचा, जेव्हा सेरेनाने दिली होती शिवी... 
 
बातम्या आणखी आहेत...