स्पोर्ट्स डेस्क- WWE ची सुंदर दिवा राहिलेली ईव टॉरिस सोमवारी 33 वर्षाची झाली. टॉरिस जितकी आपल्या रेसलिंग करियरमध्ये प्रसिद्ध नाही तितकी चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिचे नाव भारताचा पैलवान 'द ग्रेट खली' शी जोडले गेले होते. WWE मध्ये खलीने मिकी जेम्सला किस केल्याने या प्रकरणाला तर अधिकच धार आली. ईवने केला होता खुलासा...
- ईव जेव्हा एका इव्हेंटसाठी भारतात आली होती तेव्हा तिने काही खुलासे केले होते. तिने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, मी खलीला व खलीने मला अनेकदा किस केले आहे. मात्र हे कधी टीव्हीवर दाखवले नाही. मात्र, ईवने हे स्पष्ट केले नाही की, दोघांत जे काही होते ते खरं होते की, स्क्रिप्टेड होते.
भडकली होती खलीची पत्नी-
2009 मध्ये खलीने सुंदर दिवा मिकी जेम्सला खुलेआम रिंगमध्ये किस केल्याने खळबळ माजली होती. याचे टेलीकास्ट पाहिल्यानंतर त्याची पत्नी भडकली होती. तसेच तिने खलीला तत्काळ परत येण्यास फर्मावले होते. खलीने पत्नीलाा कसे तरी समजवले की, हे सर्व या खेळाचा व शोचा भाग आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, ईव टॉरिसचे काही इंटरेस्टिंग फोटोज आणि काही फॅक्ट्स...