आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा भररस्त्यात पोलिसांनी पार्थिव पटेलला पकडले, काढायला लावल्या उठा- बशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत भररस्त्यात उठा-बशा काढताना पार्थिव पटेल... - Divya Marathi
मुंबईत भररस्त्यात उठा-बशा काढताना पार्थिव पटेल...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन विकेटकीपर बॅट्समन पार्थिव पटेलला एकदा पोलिसांनी पकडल्यानंतर भर रस्त्यात उठा-बशा काढायला लावल्या आहेत. होय, काही वर्षांपूर्वी पार्थिवसोबत असे घडले होते जेव्हा त्याला ट्राफिक पोलिसाने पकडले होते. यानंतर पार्थिवला कान पकडून उठा-बशा काढायला लागल्या. मात्र, हा एक प्रॅंक होता आणि पार्थिवला 'बकरा' बनवले गेले होते. आपल्याला माहित असेलच की, पार्थिवला नोव्हेंबरपासून सुरु होणा-या दलीप ट्रॉफीसाठी इंडिया ग्रीन संघाचा कर्णधार नियुक्त केले आहे. एका रियाल्टी शोने बनवले होते बकरा...
 
- 2003 मध्ये एमटीवीच्या रियल्टी शो 'बकरा' ने पार्थिवसोबत हा प्रॅंक केला होता. 2003 च्या वर्ल्डकप टीममध्ये स्थान मिळाल्याने पार्थिव प्रसिद्धीझोतात आला होता. पार्थिवने मुंबईत एका ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी केली, प्रॅंकमध्ये सामील असलेला टॅक्सी ड्रायवरने भर रस्त्यात पार्थिवला सांगितले की, माझी तब्बेत ठीक वाटत नाही काही वेळाकरिता चालव.
- साध्या-भोळ्या पार्थिवने टॅक्सी ड्रायवरचे म्हणणे ऐकले आणि टॅक्सी चालवायला सुरूवात केली. काही अंतरावर गेल्यावर बनावट पोलिसाने त्यांची टॅक्सी अडवली. पोलिसांनी पार्थिवचा कान पकडून उठा-बशा काढायला लावल्याच पण 4 हजार रुपये दंड वसूल केला. दुसरीकडे, हे सर्व कॅमे-यात रिकॉर्ड केले जात होते. 
- पोलिसांनी सोडल्यानंतर पार्थिव टॅक्सी ड्रायवरवर जाम भडकला. यानंतर टॅक्सी ड्रायवरने पार्थिवला म्हटले की, मला मेडिकल दुकानापर्यंत घेऊन चल. पार्थिवने तेही केले, मात्र त्यानंतर लक्षात आले की त्याला 'बकरा' बनवले गेले आहे. हे सर्व शो टीव्हीवर खूप हिट झाले होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पार्थिव पटेलचे आणखी काही फोटोज व फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...