आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Shah Rukh Khan Met His Fan Badminton Star Saina Nehwal

सायना शाहरुखची मोठी फॅन, 'दिलवाले' च्या स्टारकास्टबरोबर केले PHOTOSHOOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानसह सायना नेहवाल. तेथे फिल्म अॅक्ट्रेस काजोलही होती. - Divya Marathi
शाहरुख खानसह सायना नेहवाल. तेथे फिल्म अॅक्ट्रेस काजोलही होती.
जगातील नंबर एकची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल शाहरुख खानला भेटल्यानंतर फार आनंदी आहे. प्रसिद्ध सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचा रिमेक ‘दिलवाले’च्या शूटिंगदरम्यान किंग खानने सायनाची हैदराबादमध्ये भेट घेतली. जेव्हा सायनाला कळले की शाहरुख फिल्मच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आला आहे. तेव्हा तिने शाहरुखला भेटन्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर शाहरुखने तिला भेटण्याचे प्रॉमिस केले होते.
शाहरुखने लिहिले गाणे...
शाहरुखने इंस्टाग्रामवर सायनासह आपला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने हमजोली सिनेमात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेले प्रसिद्ध गीत ‘ढल गया दिन, हो गयी शाम’ हे गाणे ही लिहिले आहे. त्याने लिहिले आहे, "ढल गया दिन, हो गई शाम, जाने दो जाना है. हमजोली सिनेमाचे हे गाणे कुणाला माहित नसेल. माझा सायनासह ‘टुक-टुक’टाइम पास.” फोटोत दोघांनीही आपापल्या हातात रॅकेट पकडले आहे. मात्र सायनाच्या रॅकेटला स्ट्रिंग्स नाही. बॉलीवुड स्टारने या विषयी लिहिले आहे की, सायनाला हरवण्याचा हाच एक मार्ग आहे.
सायना शाहरुखची मोठी फॅन आहे
साइनाने लिहिले आहे की, ओह! माय गॉड. शाहरुख सर, आपण फार चांगले व्यक्ती आहात. तुम्हाला भेटून फार आनंद झाला. खूप-खूप धन्यवाद. सायनाने या सिनेमातील वरुण धवन, कृति शेनॉन यांच्यासहदेखील फोटो शेअर केले. सिनेमाचे निर्देशक रोहित शेट्टीचेही तिने शूटिंगदरम्यान आमंत्रित केल्या बद्दल आभार मानले. भारतीय बॅडमिंटन स्टार सायना शाहरुख खानची फार मोठी फॅन आहे. तिने तर एकदा 'आय लव्ह शाहरुख' असेही म्हटले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दिलवालेच्या स्टारकास्टसह सायना नेहवाल आणि तिच्या फॅमिलीचे फोटोज...