आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानियाने कुणाला म्हटले विषारी ? नाव न घेता लिएंडर पेसवर केली टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी एक ट्विट केले. टि्वटमध्ये सानिया म्हणाली, “एखाद्या विषारी व्यक्तीशी जिंकण्याचा एकच मार्ग आहे..त्याच्यासोबत खेळूच नये.’ अखेर कोण आहे हा विषारी खेळाडू ? सानियाने कुणाला विषारी म्हटले ?...संकेतानुसार सानियाने लिएंडर पेससाठी हे ट्विट केले .


..पेसने केली आधी टीका : हे भांडण लिएंडर पेसने सुरू केले. शनिवारी डेव्हिस चषकाच्या सामन्यानंतर पेस म्हणाला, ‘रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत भारताकडे पदक जिंकण्याची संधी होती. मात्र, संघ निवड योग्य झाली नाही. १४ महिन्यांत ४ ग्रँडस्लॅम जिंकण्याशिवाय आणखी कोणी काय करू शकतो ? रिओत जे काही घडले, ते दु:खद आहे,’असे पेसने म्हटले होते. पेसच्या या टीकेनंतर सानिया मिर्झानेही नाव न घेता पेसला “विषारी’ म्हटले.


पेसचे लक्ष्य सानिया : पेसने नाव न घेता ही टीका सानिया मिर्झावर केली होती. सानियाने रिओत पेससोबत जोडी केली असती तर भारतला पदक मिळाले असते, असे पेसला म्हणायचे होते. मात्र, या वेळी सानियाने रिओत राेहन बोपन्नासोबत जोडी बनवली होती. ही जोडी विशेष कामगिरी करू शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...