आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Williams Said Someone Tried To Steal Her Cellphone And Run Away With It

#SuperSerena: रेस्तराँमधून मोबाइल घेऊन पळाला चोर, सेरेनाने झेप घेऊन पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - टेनिस स्टार सेरेना विल्यम्सचा मोबाइल फोन चोरण्याचा प्रयत्न झाला. एका रेस्त्रांमध्ये ही घटना घडली. सेरेना एका मित्रासह रेस्तराँमध्ये पोहोचली होती. ही घटना मंगळवारची आहे. सेरेनासमोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अचानक तिचा मोबाइल फोन घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. सेरेनाने दोन खूर्च्यांवरुन उडी मारत त्याचा पाठलाग केला. तोपर्यंत तो रस्त्यावर पोहोचला होता. सेरेना त्याच्या मागे धावत गेली आणि त्याला पकडले. या घटनेबद्दल स्वतः सेरेनाने तिच्या फेसबुक पेजवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर सेरेनाने स्वतःचे कौतूक करत 'सुपर हिरो' प्रमाणे स्वतःता उल्लेख 'सुपर सेरेना' असा केला आहे.
सेरेनाने काय पोस्ट केले
>> सेरेनाने तिच्या एफबी पोस्टमध्ये म्हटले आहे, 'मंगळवारी आम्ही रेस्तराँमध्ये चायनीज फूडचा आस्वाद घेत होतो. तेव्हा एक व्यक्ती माझा फोन घेऊन पळू लगला. गर्दीला चिरत मी दोन खुर्च्यांवरुन उडी मारली आणि त्याचा पाठलाग केला. काही क्षणातच मी चोरापर्यंत पोहोचले. चोराने विचार केला होता की त्याला माझ्यापेक्षा वेगाने पळता येईल, मात्र ट्रेनिंगच्या वेळी लावलेले स्प्रिंट्स उपयोगात आले. मी वेगाने धावत त्याला पकडले.'

>> सेरेना म्हणाली, 'मी त्याला सभ्य भाषेत विचारले - जर तू चुकून माझा फोन उचलला असशील तर कृपया तो मला परत कर. आणि ती व्यक्ती म्हणाली, होय, कदाचित मी चुकीचा फोन उचलला. त्याने लगेच माझा फोन मला परत केला.'

>> चोरी झालेला फोन परत मिळाल्यांनतर जेव्हा सेरेना रेस्त्रांमध्ये आली तेव्हा सर्वांनी जागेवर उभे राहून तिचे स्वागत आणि अभिनंदन केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सेरेना विल्यम्सची फेसबुक पोस्ट...