आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon 2015 Rafael Nadal Beaten By Dustin Brown

विम्बल्डन: ROCKSTAR ब्राउनकडून गत विजेता नदाल स्‍पर्धे बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅच दरम्‍यान ब्राउन. - Divya Marathi
मॅच दरम्‍यान ब्राउन.
लंडन - दोन वेळा विम्बल्डन आणि 14 वेळा ग्रँडस्लॅमचा विजेता राफेल नदालला विम्बल्डनटेनिस स्‍पर्धेत गुरुवारी 102 रॅकिंग असलेला जर्मन खेळाडू डस्टिन ब्राउनकडून 7-5, 3-6, 6-4, 6-4 फरकाने पराभव स्‍वीकारावा लागला. या विजयामुळे ब्राउन तिसऱया स्‍थानी पोहोचला; तर नदाल स्‍पर्धेबाहेर. त्‍यामुळे ब्राउन चर्चेत आला आहे.
आपला वेगळा अंदाज आणि लुक्‍समुळे ब्राउन रॉकस्‍टारचा दर्जा मिळालेला आहे. ब्राउनीची उंची 6 फूट पाच इंज आहे. त्‍याने 19 वर्षापासून केस कापलेले नाहीत. त्‍याला टॅटू गोंदवून घेण्‍याचा छंद आहे. या शिवाय तो स्‍पर्धेत खेळण्‍यासाठी खास कँपर व्‍हॅनमध्‍ये पोहोचतो. याच व्‍हॅनमधून तो पूर्ण युरोप ि‍फरून आल्‍याचे सूत्रांनी सांगितले. हा विजय आपल्‍या आयुष्‍यातील सर्वांत चांगला दिवस असल्‍याचे त्‍याने सांगितले. त्‍याने यापूर्वीसुध्‍द़ा नडालला हरवलेले आहे. पण, ती गत वर्षी विंबलडनमध्‍ये झालेली सराव मॅच होती. दुसरीकडे नडालला ही स्‍पर्धा अत्‍यंत वाईट गेली. यापूर्वी तो फ्रेंच ओपनच्‍या उपांत्‍य सामन्‍यात स्‍पर्धेबाहेर पडला होता. नउ वेळा फ्रेंच ओपन स्‍पर्धा जिंकून त्‍याने विक्रम स्‍थापन केलेला आहे. पराभवानंतर नडालने म्‍हटले, ''हा शेवट नाही. हा त्रासदायक काळ आहे. पण, लवकरच यातून बाहेर पडू.''
डस्टिन ब्राउन
>8 डिसेंबर 1984 ला जन्म
>वडील जमैकाचे तर आई जर्मन
>1996 मध्‍ये ब्राउन जमैकाला गेला.
>जमैकाकडून तो काही काळ खेळलासुध्‍दा
>हँडबॉल, फुटबॉल आणि जूडोही त्‍याने खेळून पाहिले.