आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुपतीने शोधले सुमीत नागलला, 17 व्या वर्षी देशाला मिळवून दिला लौकिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विम्बल्डन डिनर पार्टीत नोवाकसोबत जोकोविक दुसऱ्या छायाचित्रात सेरेनासोबत सुमीत. - Divya Marathi
विम्बल्डन डिनर पार्टीत नोवाकसोबत जोकोविक दुसऱ्या छायाचित्रात सेरेनासोबत सुमीत.
नवी दिल्ली - प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत ज्युनियर दुहेरीचे जेतेपद िमळवून प्रकाशझोतात आलेल्या सुमीत नागलने या टेनिस मोसमाच्या शेवटपर्यंत पुरुष एकेरीत उत्तम खेळ करून जगातील अग्रणी ३०० टेनिसपटूंमध्ये स्थान पटकावण्याचे आपले मुख्य लक्ष्य असल्याचे सांगितले.

फ्रँकफर्टजवळील शटलर वॅस्के टेनिस विद्यापीठात प्रशिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय नागलने व्हिएतनामच्या नाम होआंग लीच्या जोडीने विम्बल्डन ज्युनियर दुहेरीचा िकताब िमळवला.
ज्युनियर एकेरीत ऑस्ट्रेलियन

{ नागल महेश भूपतीचा शोध आहे. मागच्या ६ वर्षांपासून तो महेश भूपतीशी जोडलेला आहे.

{ सहा वर्षांनंतर भारताच्या ज्युनियर खेळाडूने ग्रँडस्लॅम जिंकले. युकी भांबरीने २००९ मध्ये ज्युनियर एकेरीत ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला होता.

{ सुमीत ज्यु. ग्रँडस्लॅम जिंकणारा सहावा भारतीय खेळाडू. यापूर्वी कृष्णन, रमेश कृष्णन, लियांडर पेस, सानिया मिर्झा, युकी भांबरी यांनी ही कामगिरी केली आहे.

{ सुमीत वयाच्या ७ वर्षांपासून टेनिस खेळत आहे.

{ सुमीतचा जन्म झज्जर येथे झाला. मात्र, तो दिल्लीचा रहिवासी आहे.

{ योकोविक व राफेल नदाल सर्वात अावडते खेळाडू अाहेत.