आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस स्पर्धा अाजपासून, राॅजर फेडरर अाठव्या किताबासाठी उत्सुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - यंदाच्या सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेेला साेमवारपासून सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीचा अाठव्यांदा किताब अापल्या नावे करण्यासाठी राॅजर फेडरर उत्सुक अाहे.

अजिंक्यपदावरचे अापले वर्चस्व कायम ठेवण्याचा जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचा प्रयत्न असेल. त्याने गतवर्षी या स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले हाेते. मात्र, त्याला नदालच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. त्यापाठाेपाठ अाता वावरिंकाही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज अाहे.

महिला गटात जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सचा विजेतेपदावर नाव काेरण्याचा प्रयत्न असेल. यासाठी शारापाेवा व सिमाेना उत्सुक अाहेत. मात्र, गत विजेती पेत्रा अाव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिल.

महिला दुहेरीत सानिया-मार्टिना फाॅर्मात
महिला दुहेरीतील जगातील नंबर वन सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगीस फाॅर्मात अाहेत. महिला दुहेरीच्या अजिंक्यपदासाठी या जाेडीला प्रबळ दावेदार मानले जात अाहे. मात्र, या जाेडीला गतविजेत्या सारा इराणी अाणि राॅबर्टा व्हिन्सीच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. यंदाच्या सत्रात जेतेपदावर नाव काेरून सानिया-मार्टिनाने क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...