लंडन- वर्षातील तिस-या ग्रॅंड स्लॅम विंबल्डनमध्ये त्यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली जेव्हा पुरुष डबल्स लढतीत उरूग्वेच्या पाब्लो क्यूवासला सामन्यादरम्यान टॉयलेट ब्रेक नाही मिळाला. याबाबत त्याने कोर्टवरच बसून निषेध सुरू केला. तिस-या फेरीदरम्यान ही घटना घडली. सामन्यादरम्यान असे काही घडले...
- पाब्लो आणि त्याचा जोडीदार स्पेनचा मार्सेल ग्रॅनोलर्सची लढत जॉनी मरे आणि आदिल शमसादीनसोबत सुरु होती.
- जो सामना पाच सेटपर्यंत खेचला गेला. ज्यानंतर उरूग्वेचा खेळाडूने टॉयलेटला जाण्यासाठी अंपायर ऑरिलिया टोर्टे यांच्याकडे ब्रेक मागितला.
- मात्र, अंपायरने त्याची मागणी धुडकावून लावली. या सामन्यात 15 वी मानांकित जोडी पाब्लो-मार्सेल 6-3, 4-6, 6-4, 3-6, 14-12 अशी लढत हरून स्पर्धेबाहेर गेली.
विरोधी खेळाडूही अंपायरच्या विरोधात-
- ब्रिटिश खेळाडू मरेने पाब्लोची बाजू घेतली. तो म्हणाला, अंपायरने याप्रकरणी जास्त ताणून धरण्याची गरज नव्हती.
- टॉयलेट ब्रेक दिला पाहिजे. मला वाटते जर मॅच 5 सेटपर्यंत पोहचली असेल तर टायलेट ब्रेक दिलाच गेला पाहिजे.
- आपल्याला अनेक वेळा अशा गोष्टीचा सामना करावा लागतो. मी सुद्धा एका सामन्यादरम्यान दोनचा टायलेटला गेलो होतो.
- 5 वा सेट खूप वेळ लांबला होता. अशा वेळी तुम्हाला अतिरिक्त वेळ दिलाच पाहिजे. मात्र, खेळाडूंनी ऑफिशियल्सचा व त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.
पुढे स्लाईडसद्वारे पाहा, संपूर्ण प्रकरणाच्या दरम्यानचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)