आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस: स्विस किंग उपांत्य फेरीत, फेडररचा फाॅर्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपांत्यपूर्व सामन्यात परतीचा फटका मारताना रॉजर फेडरर. - Divya Marathi
उपांत्यपूर्व सामन्यात परतीचा फटका मारताना रॉजर फेडरर.
लंडन - अँडी मरे आणि स्विस किंग नावाने जगभर प्रसिद्ध असलेल्या रॉजर फेडररने बुधवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. जबरदस्त फॉर्म आणि फिटनेसची प्रचिती देत स्वित्झर्लंडच्या फेडररने क्वार्टर फायनलमध्ये फ्रान्सच्या जाइल्स सिमोनला हरवले. फेडररने ही लढत सरळ तीन सेटमध्ये ६-३, ५-७, ६-२ ने जिंकली. मरेनेही सहज विजय मिळवला.
उपांत्यपूर्व सामन्यात फेडरर सुरुवातीपासून आक्रमक दिसत होता. त्याने विरोधी खेळाडूला सावरण्याची एकही संधी दिली नाही. फेडररने ही लढत १ तास आणि ३५ मिनिटांत आपल्या नावे केली. फेडररचे बॅकहँडचे फटके आणि वेगवान सर्व्हिस जबरदस्त अशीच होती. वयाच्या ३३ वर्षी फेडररच्या चपळ आणि वेगवान खेळावर चाहत्यांनी टाळ्या वाजवून त्याला आणखी चांगल्या खेळासाठी प्रेरीत केले. फेडररने सामन्यात विरोधी खेळाडू सिमोनच्या तुलनेत (१) तब्बल ११ ऐस मारले. सिमोनने २, तर फेडररने एक डबल फॉल्ट केला. फेडररने ८ पैकी ५ ब्रेकपाॅइंट मिळवून आघाडी घेतली. सिमोनला फक्त एक ब्रेकपॉइंट घेता आला. फेडररने ३६ विनर्स मारले.

बोपन्ना-मेर्जिया सेमीफायनलमध्ये
भारताचा रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जिया यांनी पुरुष दुहेरीत धक्कादायक विजय मिळवताना माईक आणि बॉब ब्रायन बंधूंना पराभूत केले. अत्यंत रोमांचक सामन्यांत बोपन्ना-मेर्जिया नवव्या मानांकित जोडीने अव्वल मानांिकत बॉब आणि माईक बंधूंना दोन तास आणि ३५ मिनिटांच्या संघर्षानंतर ५-७, ६-४, ७-६, ७-६ ने हरवले. बोपन्ना-मेर्जिया जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करताना पुढचे तिन्ही सेट जिंकले. त्यांनी सामन्यांत पहिल्या सर्ववर ६७ टक्के गुण मिळवत बाजी मारली.

पुढे वाचा... अँडी मरेची विजयी आगेकूच