आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस: सानिया मिर्झा- मार्टिना हिंगिस दुहेरीत चॅम्प!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अव्वल मानांकित सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगिस सत्रातील तिसऱ्या ग्रॅण्डस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरल्या. या अव्वल मानांकित जाेडीने शनिवारी मध्य रात्री महिला दुहेरीचा किताब पटकावला. या जाेडीने अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित एकतारिना मकाराेवा अाणि एलेना वेस्निनाचा पराभव केला. सानिया-मार्टिनाने रंगतदार सामन्यात ५-७, ७-६, ७-५ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. तब्बल दाेन तास २४ मिनिटे शर्थीची झंुज देऊन अव्वल मानांकित जाेडीने जेतेपदावर नाव काेरले.

दमदार सुरुवात करताना सानिया अाणि मार्टिनाने पहिल्या सेटमध्ये शानदार खेळी केली. मात्र, सरस कामगिरीच्या बळावर दुसऱ्या मानांकित जाेडीने बाजी मारून पहिला सेट जिंकला. त्यांनी अवघ्या ३८ मिनिटांमध्ये पहिला सेट अापल्या नावे केला. या वेळी अव्वल मानांकित सानिया अाणि मार्टिनाने जाेरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, टायब्रेकरपर्यंत रंगलेला हा सेट दुसऱ्या मानांकित जाेडीने जिंकला. त्यानंतर दमदार पुनरागमन करून सानिया अाणि मार्टिनाने लढतीत बराेबरी साधली. तब्बल ५१ मिनिटे रंगलेला दुसरा सेट जिंकून त्यांनी लढतीत बराेबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या अाणि निर्णायक सेटमध्ये सानिया अाणि मार्टिनाने पुनरागमन करून काेर्टवर ताबा मिळवला. सरस खेळीच्या बळावर लागाेपाठ गुणांची कमाई करून या अव्वल मानांकित जाेडीने सेट जिकंून सामना अापल्या नावे केला.

दुहेरीत प्रथमच सानियाला जेतेपद
भारताचीटेनिस स्टार सानिया मिर्झाने शनिवारी रात्री अापल्या करिअरमध्ये महिला दुहेरीचा पहिला ग्रॅॅण्डस्लॅम विम्बल्डनचा किताब पटकावला. तिने स्वीसच्या मार्टिनासाेबत उल्लेखनिय कामगिरी करून हे साेनेरी यश संपादन केले. या जाेडीचा हा पहिलाच महिला दुहेरीचा किताब अाहे. भारताच्या सानियाचे करिअरमधील पहिले महिला दुहेरीचे जेतेपद अाहे. यासाठी केलेली मेहनत फळाला अाली अाहे.

सेरेनाचे विक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम !
जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स शनिवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने सहाव्यांदा या स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. अमेरिकेच्या सेरेनाने अंतिम सामन्यात स्पेनची युवा खेळाडू गार्बिने मुगुरुझाला पराभूत केले. तिने ६-४, ६-४ अशा फरकाने सरळ दाेन सेटमध्ये एकतर्फी विजयाची नाेंद केली. अव्वल मानांकित सेरेनाने अवघ्या ८२ मिनिटांत जेतेपदावर नाव काेरले. टेनिस करिअरमधील तिचे हे २१ वे ग्रँडस्लॅम ठरले.

अव्वल मानांकित सेरेनाने फायनलमध्ये अपेक्षेप्रमाणे दमदार सुरुवात केली. या वेळी तिने सरस सर्व्हिस करताना पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. यासह तिने लढतीत अाघाडी मिळवली. या सेटवर तिने तीन एेस मारून काेर्टवर सहज ताबा मिळवला. दरम्यान, बराेबरीची खेळी करून स्पेनच्या खेळाडूनेही ३ एेस मारले. मात्र, सरस १६ विनर्स मारून सेरेनाने हा सेट अापल्या नावे केला. त्यानंतर तिने दुसऱ्या सेटमध्येही अापला दबदबा कायम ठेवला. या दरम्यान, २१ व्या मानांकित मुगुरुझाने कमबॅकचा प्रयत्न केला. मात्र, तिला जगातील नंबर वन सेरेनाचे अाव्हान राेखता अाले नाही. या वेळी अमेरिकेच्या खेळाडूने सरस खेळी करून दुसरा सेट जिंकून फायनल अापल्या नावे केली. स्पेनच्या खेळाडूने विजयासाठी दिलेली एक तास २२ मिनिटांची झंुज व्यर्थ ठरली.

फेडरर-नोवाकमध्ये अाज फायनल
नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि स्विसकिंग राॅजर फेडरर रविवारी पुरुष एकेरीच्या किताबासाठी झंुजणार अाहेत. गतवर्षीही फेडरर अाणि नाेवाक याेकाेविक या दाेघांमध्येच अंतिम सामना रंगला हाेता. या पाच सेटपर्यंत रंगलेल्या फायनलमध्ये सर्बियाच्या याेकाेविकने बाजी मारून फेडररला धूळ चारली हाेती. अाता याच पराभवाचा वचपा काढण्याचा फेडररचा प्रयत्न असेल. दोघांत अातापर्यंत ३९ वेळा या सामने झाले. यामध्ये फेडररने २० वेळा विजय मिळवला, तर याेकाेविकला १९ विजय मिळाले.

ग्रँडस्लॅमचे स्वप्न भंगले
स्पेनच्या २१ वर्षीय मुगुरुझाने प्रथमच टेनिसच्या करिअरमध्ये ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारली हाेती. तिने अव्वल मानांकित खेळाडूंना धूळ चारली. त्यामुळेच तिचा अात्मविश्वास द्विगुणित झाला हाेता. टेनिस कारकीर्दीत पहिल्या ग्रँडस्लॅमवर नाव काेरण्याचे स्पेनच्या २१ वर्षीय गार्बिने मुुगुरुझाचे स्वप्न धुळीस मिळाले.

२१ वे ग्रँडस्लॅम
जगातील नंबर वन सेरेेना विल्यम्सने शनिवारी टेनिस करिअरमध्ये २१ व्या ग्रँडस्लॅमची अापल्या नावे नाेंद केली. तिने गार्बिने मुगुरुझाला बाद करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे जेतेपद अापल्या नावे केले. तिचे या स्पर्धेचे हे सहावे अजिंक्यपद ठरले. सेरेनाने यापूर्वी २००२, २००३, २००९, २०१०, २०१२ मध्ये विम्बल्डन जिंकले होते.
आॅस्ट्रेलियन ओपन : २००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५.
फ्रेंच ओपन : २००२, २०१३, २०१५.
विम्बल्डन ओपन : २००२, २००३, २००९, २०१०, २०१२, २०१५.
अमेरिकन ओपन : १९९९, २००२, २००८, २०१२, २०१३, २०१४.
पुढील स्लाईडवर बघा, या मॅचचा रोमांच.... इतरांनी गौरविण्यात आले....
बातम्या आणखी आहेत...