आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon Tennis: Sania Martin Entered In Semifinal

विम्बल्डन टेनिस स्पर्धा: सानिया-मार्टिना उपांत्य फेरीत; बाेपन्नाची झुंज अपयशी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला दुहेरीचा सामना जिंकल्यानंतर हसतमुख बाहेर पडताना मार्टिना अाणि सानिया मिर्झा. - Divya Marathi
महिला दुहेरीचा सामना जिंकल्यानंतर हसतमुख बाहेर पडताना मार्टिना अाणि सानिया मिर्झा.
लंडन - अव्वल मानांकित सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगीसने विजयी माेहीम अबाधित ठेवत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे भारताचा राेहन बाेपन्ना अाणि फ्लाेरिन मेरेगाला पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. तसेच स्पेनच्या गार्बिने मुगुरुझाने महिला एकेरीची फायनल गाठली.

सानिया-मार्टिनाने या जाेडीने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत एकतर्फी विजयाची नाेंद केली. अव्वल मानांकित सानिया-मार्टिनाने लढतीत डेक्लासक्यू अाणि श्वेदाेवावर ७-५, ६-३ ने पराभूत केले. यासह जाेडीने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. यासाठी त्यांना १ तास १८ मिनिटे झुंज द्यावी लागली.
बाेपन्ना ३ तास २३ मिनिटांत पराभूत
भारताच्या राेहन बाेपन्नाचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पराभव झाला. बाेपन्ना अाणि मेरेगाने ३ तास २३ मिनिटे दिलेली झुंज अपयशी ठरली. चाैथ्या मानांकित ज्युलीयन राॅजर अाणि हेराऊ टेकाऊने बाेपन्ना-मेरेगावर ४-६, ६-२, ६-३, ४-६, १३-११ अशा फरकाने मात केली. या शानदार विजयासह चाैथ्या मानांकित जाेडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, पराभवाने नवव्या मानांकित जाेडीला बाहेर पडावे लागले.

सफाराेवा-माटेकचा पराभव
तिस-या मानांकित लुसी सफाराेवा अाणि बेथानी माटेक-सँडचे महिला दुहेरीतील अाव्हान संपुष्टात अाले. या जाेडीला उपांत्यपूर्व फेरीत काेप-जाॅन्स अाणि स्पियर्सने अवघ्या ५६ मिनिटांमध्ये सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली.

स्टॅन वावरिंकाचे पॅकअप
फ्रेंच अाेपन चॅम्पियन स्टॅन वावरिंकाला यंदाच्या सत्रातील तिस-या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. त्याला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात अनपेक्षित पराभवाला सामाेरे जावे लागले. फ्रान्सच्या राॅबर्ट गाॅस्केटने अंतिम अाठमधील सामन्यात चाैथ्या मानांकित वावरिंकाला धूळ चारली. या वेळी २१ व्या मानांकित खेळाडूने ६-४, ४-६, ३-६, ६-४, ११-९ अशा फरकाने सनसनाटी विजयाची नाेंद केली. या पराभवासह स्विसच्या वावरिंकाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. यासाठी फ्रान्सच्या गास्केटने तीन तास २८ मिनिटे झंुज देऊन विजयश्री खेचून अाणली.

रंदावास्का बाहेर; गार्बिने विजयी
स्पनेच्या गार्बिने मुगुरुझाने गुरुवारी महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात १३ व्या मानांकित अग्निजस्का रंदावास्काचा पराभव केला. २१ व्या मानांकित गार्बिनेने १ तास ५५ मिनिटांमध्ये ६-२, ३-६, ६-३ ने विजय मिळवून रंदावास्काला बाहेरचा रस्ता दाखवला.
७८ मिनिटांची झुंज
७-५ पहिला सेट
६-३ दुसरा सेट