आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon Tennis: Sania Martina Entered Last Eight Group

विम्बल्डन टेनिस : सानिया-मार्टिनाची अंतिम अाठमध्ये धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अव्वल मानांकित सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगीसने विजयी माेहीम कायम ठेवताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दुसरीकडे सेरेना, मारिया शारापाेवाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सानिया-मार्टिनाने चाैथ्या फेरीत १६ व्या मानांकित अॅनाबेल मेडिया-अरांट्रा पॅरा सांताेजावर मात केली. अव्वल मानांकित जाेडीने ६-४, ६-३ अशा फरकाने सरळ दाेन सेटमध्ये विजय मिळवला. या विजयासह त्यांनी अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला.

दमदार सुरुवात करताना अव्वल मानांकित जाेडीने पहिल्या सेटवर अाक्रमक खेळी केली. दरम्यान, १६ व्या मानांकित जाेडीने सानिया-मार्टिनाला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरस खेळीच्या बळावर अव्वल मानांकित जाेडीने सेट अापल्या नावे केला.

व्हीनसचा ६७ मिनिटांत पराभव : जगातील माजी नंबर वन व्हीनसचे अवघ्या ६७ मिनिटांत स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिला महिला एकेरीच्या चाैथ्या फेरीत जगातील नंबर वन सेरेनाने सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. सेरेनाने ६-४, ६-३ अशा फरकाने विजय मिळवून पुढच्या फेरीत धडक मारली. या पराभवासह १६ व्या मानांकित व्हीनसला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अमेरिकेच्या विल्यम्स भगिनींमधील हा सामना रंगतदार झाला. मात्र, यात सेरेनाने सरस खेळी करून बाजी मारली.

शारापाेवाची अागेकूच
चाैथ्या मानांकित मारिया शारापाेवाने अंतिम १६ मधील प्रवेश निश्चित केला. तिने एकेरीच्या चाैथ्या फेरीत कझाकिस्तानची झरीना दियासला ६-४, ६-४ ने हरवले. अाता तिचा सामना अमेरिकेच्या वांदेवेगेशी हाेईली. अमेरिकेच्या या खेळाडूने चाैथ्या फेरीत सफाराेवाविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंद केली.

लुसी सफाराेवाचा अनपेक्षित पराभव
सहाव्या मानांकित लुसिया सफाराेवाला पराभवाचा सामना करावा लागला. तिला एकेरीच्या लढतीत वांदेवेगेने ७-६, ७-६ ने पराभूत केले. तिने एक तास ४८ मिनिटांमध्ये विजय मिळवला.
छायाचित्र: दुहेरीच्या लढतीदरम्यान डावपेच अाखताना सानिया अाणि मार्टिना. त्यांनी हा दुहेरीचा सामना जिंकला.