आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon Tennis: Sharapova Entered In Semifinal

विम्बल्डन टेनिस: शारापाेवाची सेमीफायनलमध्ये धडक; पेस-मार्टिनाची अागेकूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - माजी चॅम्पियन मारिया शारापाेवाने मंगळवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. तिने महिला एकेरीच्या अंतिम ८ मधील सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. चाैथ्या मानांकित शारापाेवाने रंगतदार सामन्यात अमेरिकेच्या वांदेवेगेवर ६-३, ६-७, ६-२ अशा फरकाने मात केली. तिने दाेन तास ४६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात असा विजय मिळवला. यासह तिने अापला अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. दुस-या सेटमधील अपयशातून सावरलेल्या चाैथ्या मानांकित शारापोवाने तिस-या सेटमध्ये बाजी मारून सामना अापल्या नावे केला. यासाठी तिला वेदेंवेगेने चांगलचे झुंजवले. गत सामन्यात अमेरिकेच्या या खेळाडूने लुसीला हरवले हाेेते.

याेकाेविकची २२७ मिनिटांची झुंज
पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मधील सामन्यात अव्वल मानांकित नाेवाक याेकाेविकला २२७ मिनिटे म्हणजेच तीन तास ४७ मिनिटे झुंज द्यावी लागली. त्यानंतर त्याला राेमहर्षक विजयाची नाेंद करता अाली. जगातील नंबर वन याेकाेविकने लढतीत दक्षिण अाफ्रिकेच्या केविन अँडरसनचा पराभव केला. त्याने ६-७, ६-७, ६-१, ६-४, ७-५ नेे सामना जिंकला. यासाठी त्याला अँडरसनने चांगलेच झुंजवले. सुरुवातीचे दाेन सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करून याेकाेविकने सामना अापल्या नावे केला. त्याने तिस-या सेटमध्ये बाजी मारली अाणि कमबॅक केले. त्या पाठाेपाठ त्याने चाैथा सेट जिंकून बराेबरी साधली. दरम्यान, दाेन्ही खेळाडूंमध्ये निर्णायक सेटमध्ये अधिकच लढत रंगली. त्यामुळे हा सेट ट्रायब्रेकरपर्यंत खेचला गेला होता.

पेस-मार्टिना मिश्र दुहेरीमध्ये विजयी
भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेसने विजयी माेहीम अबाधित ठेवत मंगळवारी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिससोबत मिश्र दुहेरीच्या तिस-या फेरीतील सामना जिंकला. या सातव्या मानांकित जाेडीने अर्टेम सिताक व अनास्तासिया राेडिनाेवाचा पराभव केला. पेस-मार्टिनाने ४८ मिनिटांमध्ये ६-२, ६-२ ने विजयाची नाेंद केली. विजयासह या जाेडीने अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी पेस अाणि मार्टिना ही पहिली जाेडी ठरली. सानियासाेबत महिला दुहेरीत नशीब अाजमावत असलेल्या मार्टिनाची मिश्र दुहेरीत पेसला महत्त्वाची साथ मिळाली.