आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युलरचा सनसनाटी विजय; मॅरेथाॅन लढतीत नदाल पराभूत, मिलाेस राअाेनिकची ज्वेरेववर मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - लक्झमबर्गच्या जाइल्स म्युलरने यंदाच्या सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेत मंगळवारी सनसनाटी विजय संपादन केला. या १६ व्या मानांकित खेळाडूने प्री-क्वार्टरमध्ये माजी नंबर वन राफेल नदालला धूळ चारली. त्याने ४ तास ४८ मिनिटांच्या मॅरेथाॅन लढतीत ३-२ ने विजय संपादन केला.  
 
दुसरीकडे तिसऱ्या मानांकित राॅजर फेडरर, कॅनडाच्या मिलाेस राअाेनिक, सहावी मानांकित काेन्ताने उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच अाठव्या मानांकित डेव्हिड थिएमचा पराभव झाला. भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झालाही महिला दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला.  
 
फेडररचा विक्रमी १५ व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश :  स्विसकिंग राॅजर फेडररने विक्रमी १५ व्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने  पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्याने लढतीमध्ये १३ व्या मानांकित ग्रिगाेर दिमित्राेवचा पराभव केला.त्याने ६-४, ६-२, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने अवघ्या १ तास ३८ मिनिटांमध्ये अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. तसेच दिमित्राेवविरुद्धचा फेडररचा हा सहावा विजय ठरला. अाता त्याचा सामना मिलाेस राअाेनिकशी हाेईल.  
 
मिलाेस राअाेनिकची ज्वेरेववर मात
सहाव्या मानांकित मिलाेस राअाेनिकने पुुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने लढतीत दहाव्या मानांकित ज्वेरेवचा पराभव केला. कॅनडाच्या राअाेनिकने ४-६, ७-५, ५-६, ७-५, ६-१ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. यासाठी त्याला तब्बल ३ तास २३ मिनिटे पाच सेटपर्यंत शर्थीची झंुज द्यावी लागली. अाता त्याच्यासमाेर अंतिम अाठमध्ये तिसऱ्या मानांकित फेडररचे तगडे अाव्हान असेल.  
 
याेकाेविक, मुगुरुझाची अागेकूच : माजी नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि गार्बिने मुगुरुझाने अागेकूच केली. याेकाेविकने लढतीत मनारिन्नाेवर ६-२, ७-६, ६-४ ने मात केली. मुगुरुझाने महिला एकेरीत कुज्नेत्साेेवाला ६-३, ६-४ ने हरवले.
 
म्युलरकडून नदालचा पराभव 
लक्झेमबर्गच्या जाईल्स म्युलरने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टरमध्ये सनसनाटी विजय संपादन केला. त्याने लढतीत चाैथ्या मानांकित नदालचा पराभव केला. त्याने ६-३, ६-४, ३-६, ४-६, १५-१३ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याने पाच सेटपर्यंत झुंज दिली. त्याने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटवर सहज बाजी मारली. यासह त्याने लढतीत अाघाडी घेतली. त्यापाठाेपाठ त्याने दुसरा सेट जिंकला. मात्र, त्यानंतर चाैथ्या मानांकित नदालने दमदार पुनरागमन केले. त्याने तिसरा अाणि चाैथा सेट जिंकून लढतीत बराेबरी साधली. मात्र, त्याला पाचव्या अाणि निर्णायक सेटमध्ये अापली लय कायम ठेवता अाली नाही.  
बातम्या आणखी आहेत...