आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्सिलोना सलग तिसऱ्यांदा कोपा डेल रे स्पर्धेचा विजेता, नेट कापून गेरार्ड पिकचा जल्लोष !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - बार्सिलोनाने सलग तिसऱ्यांदा कोपा डेल रे फुटबॉलचा किताब जिंकला आहे. बार्सिलोनाने डेपोर्टिव एलावेसला ३-१ ने पराभूत करून २९ व्यांदा ट्रॉफी जिंकली. बार्साकडून लियोनेल मेसीने ३० व्या, नेमारने ४५ व्या आणि अल्कासेरने अवांतर वेळेत गोल केले. तर एलावेसकडून हर्नांडेजने ३३ व्या मिनिटाला गोल केला.
 
बार्सिलोनाचा डिफेंडर गेरार्ड पिकने आपल्या वेगळ्या शैलीत गोलपोस्टची नेट कापून चॅम्पियन बनल्याचा जल्लोष साजरा केला. प्रत्येक फायनल जिंकल्यानंतर गेरार्ड असाच जल्लोष करतो. त्याने आपल्या अनोख्या सेलिब्रेशन पद्धतीची सुरुवात २०११ मध्ये चॅम्पियन्स लीगच्या विजयापासून केली होती. ३० वर्षीय गेरार्ड तेव्हापासून नेट जमा करतो. गेरार्डने २०१५ मध्ये चॅम्पियन्स लीग फायनल जिंकल्यानंतर गोलपोस्टची नेट कापली होती. सामन्यामुळे गेरॉर्ड त्या मित्राच्या लग्नाला जाऊ शकला नव्हता, म्हणून त्याने त्या मित्राला नेट भेट म्हणून दिली.
 
सामन्यात मेसी, नेमारचा विक्रम
सलग ३ फायनलमध्ये गोल करणारा बार्सिलोनाचा नेमार ५७ वर्षांतील पहिला खेळाडू बनला. मेसी अॅथेलेटिक्स बिलबाओच्या तेलमो जारानंतर दुसरा खेळाडू आहे, ज्याने ४ फायनलमध्ये गोल केले. मेसीचे सत्रात ५४ गोल झाले आहेत.
 
आर्सेनलने सर्वाधिक १३ वेळा जिंकला एफए कप
लंडन - आर्सेनल एफए कपच्या १५४ वर्षांच्या इतिहासात सर्वांत यशस्वी संघ ठरला आहे. आर्सेनलने सर्वाधिक १३ वेळा एफएचा किताब जिंकला आहे. फायनलमध्ये आर्सेनलने ईपीएल चॅम्पियन चेल्सीला २-१ ने हरवले. अॅलेक्सिस सांजेचने चौथ्या मिनिटाला गोल केला.
 
पीएसजीला विक्रमी ११ व्यांदा फ्रेंच कपचा किताब 
पॅरिस - पॅरिस सेंट जर्मनने (पीएसजी) ११ व्यांदा फ्रेंच कप जिंकले आहे. पीएसजीने स्पर्धेच्या १०० व्या सत्राच्या फायनलमध्ये एंजर्स लक्बला १-० ने हरवले. निर्धारित वेळेत गोल झाला नाही. एवेंजर्सचा इसा सिख्खोच्या आत्मघातकी गोलमुळे पीएसजी चॅम्पियन बनले.
 
बातम्या आणखी आहेत...