आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी रणरागिणी: सोन्याची चेन विकून घेतल्या सप्लिमेंट्स, अश्विनी झाली बॉडीबिल्डर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडीबिल्डींगची नाव जरी घेतले तरी डोळ्यांसमोर सिक्सपॅक अॅब्ज, दणकट बायसेप, मजबूत चेस्ट आणि एकंदर रफटफ बॉडी असलेला पुरुष डोळ्यांसमोर येतो. पण आता तसे राहिले नाही. वूमन बॉडीबिल्डींगची क्रेझ सध्या दिसून येत आहे. विशेष म्हणजे कंझरव्हेटिव्ह मराठी कुटुंबांमधील मुलीही बॉडीबिल्डिंगसाठी पुढे येताना दिसून येत आहेत. अश्विनी वासकर भारताची पहिली प्रोफेशनल बॉडीबिल्डर आहे. अश्विनी अतिशय लठ्ठ होती. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तिने जिम जॉईन केली. पण अखेर बॉडीबिल्डर झाली. यासाठी तिला केवळ 10 महिन्यांचा कालावधी लागला.
केव्हा घेतला जिम जॉईन करण्याचा निर्णय
2012 मध्ये अश्विनीला जाणावले, की तिचे वजन फार वाढले आहे. कोणत्याही परिस्थितीत वजन कमी करायला हवे. तिने जिम जॉईन केली. पण प्रत्येक महिन्याला जिमची फी आणि सप्लिमेंटसाठी 20 हजार रुपये खर्च यायचा. एवढा खर्च करणे तिला झेपण्यासारखे नव्हते. तिने गळ्यातील सोन्याची चेन विकण्याचा निर्णय घेतला. याबद्दल अश्विनी सांगते, की माझ्याकडे पैसे कमी होते. मी सोन्याची चेन विकून सप्लिमेंट विकत आणल्या. त्यानंतर मन लावून तयारी केली.

वडीलांचा पाठिंबा मिळाला, नोकरी सोडली
तिला जिमला जाणे आवडू लागले. परंतू, ठराविक वेळेत जिम आणि त्यानंतर नोकरी करणे काही शक्य नव्हते. ती सेंट्रल इंन्स्टिट्यूट ऑफ फिशरिज एज्युकेशनमध्ये तात्पूरती नोकरी करीत होती. तिने अखेर नोकरी सोडली. यासाठी वडीलांनी खूप सपोर्ट केला. ते तिच्या ट्रेनिंग सेंटरवरही यायचे.
अश्विनीबाबत काही खास
- अश्विनी रायगड जिल्हातील आहे.
- आतापर्यंत तिने 7 आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे.
- दुर्देवाने तिला आतापर्यंत कोणताही स्पॉन्सरर मिळालेला नाही.
- राष्ट्रीय स्तरावर तिने अनेक पुरस्कार पटकावले आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा मराठमोठ्या अश्विनी वासकरचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...