आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी मलिकचा परिणाम: पैलवान मुलींची कुस्ती पाहायला 1 लाख लोकांची गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीची पैलवान नीलम सोलंकी व रोहतकच्या सीमा यांच्यात लढत झाली. ज्यात नीलम सोलंकी विजयी झाली. - Divya Marathi
दिल्लीची पैलवान नीलम सोलंकी व रोहतकच्या सीमा यांच्यात लढत झाली. ज्यात नीलम सोलंकी विजयी झाली.
टोडाभीम/करीरी(राजस्थान)- हरियाणाची पैलवान साक्षी मलिकने रिओ ऑलिंपिकमध्ये कुस्तीत मेडल जिंकले आणि रातोरात ती स्टार झाली. साक्षीच्या कुस्तीतील मेडलने देशातील महिला कुस्ती पैलवानांना महत्त्व येऊ लागले आहे. गुरुवारी राजस्थानमधील भैरोजी महाराजच्या लक्खी यात्रेत महिला कुस्तीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील विविध राज्यातील महिला पैलवानांनी सहभाग घेतला. येथील स्पर्धेत दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडसह देशातील कानाकोप-यातून महिला पैलवानांनी हजेरी लावली. ही कुस्ती पाहण्यासाठी राजस्थानातील 67 गावांतील 1 लाख लोक उपस्थित होते.
दिल्लीच्या निलमने जिंकली लढत-
दिल्लीची पैलवान नीलम सोलंकी व रोहतकच्या सीमा यांच्यात लढत झाली. ज्यात नीलम सोलंकी विजयी झाली. या महिला पैलवानाला दर्शकांनी डोक्यावर घेतले.
हरियाणाचा जितेश दंगल केसरी-
स्टेडियम छोटा पडू लागल्याने लोकांनी टेकडीवर जाऊन कुस्ती पाहणे पसंत केले. शेकडो पैलवानांनी आपली कौशल्य पणाला लावले. शेवटची लढत 51 हजाराची लावली गेली यात हरियाणात जितेश कुमार विजयी राहिली.
फोटो : सुनील अवस्थी
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, राजस्थानमधील लक्खी यात्रेतील कुस्तीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...