आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला हाॅकी टीम हाॅकी वर्ल्ड लीग राउंड-२ च्या फायनलमध्ये दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलगच्या विजयाने  फाॅर्मात असलेल्या भारतीय महिलांनी रविवारी हाॅकी वर्ल्ड लीग राउंड-२ च्या फायनलमध्ये धडक मारली. भारताच्या महिला हाॅकी टीमने उपांत्य सामन्यात बेलारुसचा  ४-० अशा फरकाने पराभव केला. गुरजित काैर (१३, ५८ वा मि.), कर्णधार राणी (२०, ४० वा मि.) यांनी गाेलचा डबल धमाका उडवून भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला. 

भारत-चिली झुंजणार 
अाता किताबासाठी भारत अाणि चिली महिला टीम फायनलमध्ये झुंजणार अाहेत. या दाेन्ही संघांनी अापापले उपांत्य सामने जिंकून अंतिम फेरी गाठली. चिलीने उपांत्य सामन्यात उरुग्वेला २-१ ने हरवले.
बातम्या आणखी आहेत...