आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी वर्ल्ड लीग राउंड-2: भारतीय महिलांना किताब; सेमीफायनलमध्ये धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट व्हँकुव्हर- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारतीय महिला टीमने साेमवारी हाॅकी वर्ल्ड लीग राउंड-२ मध्ये किताब पटकावला. या अजिंक्यपदासह भारताच्या महिला टीमने वर्ल्ड लीग सेमीफायनलमधील अापला प्रवेश निश्चित केला. कर्णधार राणी व माेनिकाच्या सरस खेळीच्या बळावर भारताने सामना अापल्या नावे केला. भारताची सविता ही सर्वाेत्कृष्ट गाेलरक्षक ठरली. जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या भारतीय महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली.  

यासाठी झालेल्या फायनलमध्ये भारतीय महिलांनी चिलीचा पेनाल्टी शूटअाऊटमध्ये पराभव केला. भारताने ३-१ अशा फरकाने अंतिम सामना जिंकून किताबावर नाव काेरले. भारतीय महिला संघाला पुढच्या वर्षी हाेणाऱ्या हाॅकीच्या वर्ल्डकपचे तिकीट मिळवण्याची संधी अाहे.

भारत-पाक लढत १८ जुनला :येत्या १८ जुन राेजी भारतीय पुरुष टीमचा वर्ल्ड लीग सेमीफायनलमधील सामना पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी हाेईल. ही स्पर्धा १५ ते २५ जुनदरम्यान लंडनमध्ये रंगणार अाहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी हाेणार अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...