आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Womens Hockey Team Still Have Chances To Get Eligibility For Rio Olympic

महिला हाॅकीसाठी रिअाे अाॅलिम्पिकची अाशा कायम, इटलीला हरवावे लागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटवर्प, बेल्जियम - अग्रमानांकित नेदरलँड संघाकडून ७-० ने पराभूत झाल्यानंतरही भारतीय महिला हाॅकी संघाच्या रिअाे अाॅलिम्पिक समावेशाच्या अाशा अद्याप कायम अाहेत.
हाॅकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारतीय महिलांचा सामना दुबळ्या इटली संघाशी हाेणार असल्याने त्या लढतीवर भारताच्या पुढील अाशा केंद्रित झाल्या अाहेत. भारताला रिअाेमधील स्थान मिळवायचे असेल, तर इटलीला काेणत्याही स्थितीत पराभूत करावे लागणार अाहे. मात्र, इटलीने अाॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जी कामगिरी केली त्यावरून भारतीय संघाला त्यांना पराभूत करणे तितकेसे साेपे ठरणार नसल्याचेच संकेत मिळत अाहेत. भारताचे प्रशिक्षक अहेरन्स यांनी भारतीय संघाला त्यांचा खेळ उंचवावा लागणार असल्याचा इशारा दिला.