आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाॅकी वर्ल्ड लीग : रितू राणीच्या नेतृत्वात एफअायएच सेमीफायनल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या २० जूनपासून बेल्जियममध्ये एफअायएच हाॅकी वर्ल्ड लीग सेमीफायनलला प्रारंभ हाेणार अाहे. युवा खेळाडू रितू राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ या स्पर्धेत नशीब अाजमावणार अाहे. हाॅकी इंडियाने साेमवारी या स्पर्धेसाठी १८ सदस्यीय भारतीय महिला संघाची घाेषणा केली अाहे. या वेळी रितू राणीकडे टीमच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. तसेच युवा खेळाडू दीपिकाची टीमच्या उपकर्णधारपदी वर्णी लागली.

बेल्जियममधील ही स्पर्धा जिंकून फायनल गाठण्याचा भारतीय महिला हाॅकी टीमचा निर्धार अाहे. यासह भारतीय संघ अागामी रिओ अाॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार अाहे. त्यामुळे हे दुहेरी यश संपादन करण्यासाठी भारताच्या महिला उत्सुक अाहेत, अशी माहिती मुख्य प्रशिक्षक मॅथियास अारेन्स यांनी दिली.

भारतीय महिला संघ एफअायएच हाॅकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमधील अापल्या किताबाच्या माेहिमेला २० जून राेजी सुरुवात करणार अाहे. भारताचा स्पर्धेतील पहिला सामना यजमान बेल्जियम टीमशी हाेईल. त्यामुळे भारतीय महिलांसाठी हा सामना महत्त्वाचा मानला जात अाहे.

या स्पर्धेतील ब गटामध्ये भारतीय संघाचा समावेश करण्यात अाला. याच गटात जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या भारतासह अाॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड अाणि यजमान बेल्जियमचा समावेश अाहे. भारताला या गटातील सामन्यात बलाढ्य अाॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड टीमच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागणार अाहे. तसेच अ गटात हाॅलंड, काेरिया, जपान, इटली अाणि अझरबैजानचा सहभाग करण्यात अाला.

रिअाे अाॅलिम्पिकचे लक्ष्य
‘एफअायएच हाॅकी वर्ल्ड लीग राउंड-२ अाणि न्यूझीलंडमधील हाकेस बे कप हाॅकी स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीने अामचा अात्मविश्वास वाढला अाहे. अाता हीच लय बेल्जियममधील स्पर्धेतही कायम ठेवण्याचा अामचा प्रयत्न असेल. यासह अाम्हाला अागामी रिओ अाॅलिम्पिक स्पर्धेतील प्रवेश निश्चित करता येणार अाहे,’ अशी प्रतिक्रिया महिला संघाची कर्णधार रितू राणीने दिली.
बातम्या आणखी आहेत...