आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Womens ITF Chamionship At Aurangabad On Saturday

औरंगाबादेत महिला आयटीएफचे आयोजन; शनिवारपासून स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरतर्फे १६ लाख बक्षीस असलेल्या महिला आयटीएफ अजिंक्यपद स्पर्धेचे ते १६ जानेवारीदरम्यान विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत १७ देशांतील अव्वल खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धा एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारांत होईल.

स्पर्धेत यजमान भारतातील सानिया मिर्झा वगळता अव्वल चार खेळाडूंचा मुख्य फेरीत समावेश असून पात्रता फेरीतून काही खेळाडू मुख्य फेरीत प्रवेश करतील. त्याचप्रमाणे स्पर्धेत ३५० च्या क्रमवारी असलेल्या खेळाडू सहभागी होत असल्याने स्पर्धेचे महत्त्व वाढले आहे. या स्पर्धेेमुळे मराठवाड्यात खेळाचा प्रसार व्हावा या दृष्टीने ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचे ईएमएमटीसीच्या अध्यक्ष वर्षा जैन यांनी सांगितले. या स्पर्धेतून खेळाडूंना क्रमवारीत सुधारणा करण्याची नामी संधी मिळणार आहे. आगामी ३० जानेवारी रोजी थायलंडमध्ये होणाऱ्या फेड कप एशिया ओशिनिया झोन स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला लाख ५० हजार आणि उपविजेत्या खेळाडूला लाख २५ हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेच्या निरीक्षकपदी गोल्ड रेफो शीतल अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीराम गोखले ब्राँझ बॅज चेअर अंपायर म्हणून काम पाहतील. स्पर्धेच्या मुख्य लढतीस ११ जानेवारीपासून सुरुवात होईल. स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीचे दूरदर्शनवर प्रक्षेपण केले जाणार आहे.

अंकिता, नुडनिदा, वेलरिया सहभागी
भारताचीआघाडीची टेनिसपटू अंकिता रैना २५४ स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व करेल. त्याचप्रमाणे आशियाई स्पर्धेची विजेती नुडनिदा लुआंगग्नम, फ्रान्सची लुई ब्रावली, तैपेईची चिंग वने सू, स्लोव्हाकियाची तडेजा मॅजरिक, तुर्कस्तानची मेलिस सीझर, युक्रेनची वेलरिया स्त्रकोव्हा, जपानची अयाका ओकुनो आणि ऑस्ट्रेलियाची मेलानेई क्लॅफनर, थाय फड कुपर या दिग्गज खेळाडू स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावतील.