आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अभिषेक वर्माने पटकावले सुवर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राॅकला - भारताच्या अभिषेक वर्माने शनिवारी पाेलंड येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्याने कंपाउंड प्रकारात हे साेनेरी यश संपादन केले. स्पर्धेतील भारतीय संघाचे यंदा हे पहिले सुवर्णपदक ठरले. आता दीपिकाला सुवर्णची संधी आहे. जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानावर असलेल्या अभिषेकने फायनलमध्ये इराणच्या इस्माईल एबादीचा पराभव केला. त्याने १४८-१४५ अशा फरकाने फायनल जिंकून सुवर्णपदक अापल्या नावे केले.
याशिवाय भारताच्या युवा खेळाडू अभिषेकने गत इंचियाेन अाशियाई स्पर्धेत एबादीकडून मिळालेल्या पराभवाची परतफेड केली. भारताच्या टीमचे कंपाउंड प्रकारात कांस्यपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. तिसऱ्या स्थानाच्या लढतीत इटलीने भारतीय संघाला २३३-२३० ने पराभूत केले. या वेळी अभिषेक वर्मासह कवलप्रीतसिंग अाणि रजत चाैहान यांनी निराशाजनक कामगिरी केली. दुसरीकडे दीपिका अाणि मंगलने मिश्र दुहेरी रिकर्व्हमध्ये राैप्यपदक निश्चित केले. त्यांनी फायनल गाठली.