आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: सॅमने गाठली साेनेरी यशाची उंची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- अमेरिकेच्या सॅम केंड्रिक्सने उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर मंगळवारी मध्यरात्री वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये साेनेरी यशाची माेठी उंची गाठली. त्याने पुरुषांच्या बांबू उडीमध्ये (पाेल वाॅल्ट) चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने ५.९५ मीटरची उडी मारून अव्वल स्थान गाठले. यामध्ये त्याने रेनाउल्ड अाणि पिअाेट्रला पिछाडीवर टाकले. यासह त्याने अमेरिकन टीमच्या नावे तिसऱ्या सुवर्णपदकाची नाेंद केली. यामुळे अमेरिकेला एकूण ११ पदकांसह पदक तालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवता अाले. 

दुसरीकडे इव्हान जर्गेनने पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेसमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला. यातून त्याने  अमेरिका संघाला कांस्यपदक मिळवून दिले. 
 

विश्वविक्रमवीर नीरज चाेपडा सज्ज!
ज्युनियर गटातील विश्वविक्रमवीर नीरज चाेपडाची नजर भालाफेकच्या अंतिम फेरीकडे लागली. ताे गुरुवारी  हिटमध्ये काैशल्य पणास लावेेल. त्याने गतवर्षी पाेलंडमध्ये युवांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विश्वविक्रमाची नाेंद केली. त्याने ८६.४८ मीटर भालाफेक केली हाेती. 

गाेल्डनमॅन लक्ष्मणन अाता ट्रॅकवर  
गत महिन्यात झालेल्या अाशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाचा डबल धमाका उडवणारा लक्ष्मणन अाता लंडनच्या ट्रॅकवर धावणार अाहे. ताे पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या हिटमध्ये नशीब अाजमावणार अाहे. यासाठी हाेणाऱ्या दाेन हिटमध्ये ४३ धावपटू सहभागी हाेतील. 
बातम्या आणखी आहेत...