आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राैप्यपदक विजेती सायना नेहवाल पुन्हा जागतिक क्रमवारीत सिंहासनावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील राैप्यपदक विजेत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीचे सिंहासन काबीज केले. बॅडमिंटनची जागतिक क्रमवारी गुरुवारी जाहीर झाली. यामध्ये भारताच्या सायनाने वर्ल्ड चॅम्पियन कॅराेलिन मरिनवर कुरघाेडी करून अव्वल स्थान गाठले. तिचे क्रमवारीत अाता एकूण ८२७९२ गुण झाले अाहेत. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम चारमधील प्रवेशामुळे तिला क्रमवारीत माेठा फायदा झाला. तिच्या क्रमवारीत ३६०० गुणांची भर पडली. त्यामुळे तिला अव्वल स्थानावर पुन्हा एकदा विराजमान हाेता अाले. दुसरीकडे अाता स्पेनच्या मरिनची महिला एकेरीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. गत चॅम्पियनमुळे मरिनला जेतेपद पटकावूनदेखील क्रमवारीत काेणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही.

यापूर्वी सायनाने २ एप्रिल राेजी पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन काबीज केले हाेते. मात्र, २८ मे राेजी तिला हे सिंहासन साेडावे लागले. याशिवाय तिची ४ जून राेजी तिसऱ्या स्थानी घसरण झाली हाेती. मात्र, त्यानंतर तिने दुसरे स्थान गाठले हाेते.
दुसरीकडे जागतिक स्पर्धेतील दाेन वेळची कांस्यपदक विजेती सिंधू १४ व्या स्थानावर कायम अाहे. तसेच पी. कश्यपने पुरुष एकेरीत दाेन स्थानांनी प्रगती साधली. त्याने क्रमवारीत अाठवे स्थान गाठले. मात्र, इंडिया अाेपन चॅम्पियन श्रीकांतला क्रमवारीत माेठा फटका बसला. त्याची चाैथ्या स्थानावर घसरण झाली.
ज्वाला-अश्विनी टाॅप-१० मध्ये
भारताच्या ज्वाला गुट्टा अाणि अश्विनी पाेनप्पाने महिला दुहेरीच्या क्रमवारीत टाॅप-१० मध्ये धडक मारली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर या जाेडीने दुहेरीत दहाव्या स्थानावर धडक मारली. त्यांना क्रमवारीत दाेन स्थानांचा फायदा झाला.

सायनाचा कोच होणे नशीबच : विमलकुमार
नवी दिल्ली - वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकण्याचे श्रेय सायना नेहवालने आपले कोच विमलकुमार यांना दिले. मात्र, सायनाचा कोच होणे हे माझे नशीब आहे, अशी प्रतिक्रिया विमलकुमार यांनी दिली.
सायनाने खूप मेहनत घेतली. खूप कठोर मेहनतीमुळे ती आता कोर्टवर आधीपेक्षा वेगवान झाली आहे. जगातल्या कोणत्यााही खेळाडूला हरवण्याची तिची क्षमता आहे, असे विमलकुमार यांनी सांगितले. चॅम्पियनशिपमध्ये सायना वि. जपानची सायाका ताकाहशी आणि सायना वि. चीनची वांग सामन्याची त्यांनी खूप स्तुती केली. तिने दमदार खेळ केला, असे ते म्हणाले.