आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप: कश्यप, प्रणयची विजयी सलामी,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता- राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पी. कश्यप, इंडाेनेशिया मास्टर्स विजेता एचएस प्रणयने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. या दाेन्ही युवा खेळाडूंनी शानदार विजयी सलामी देत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. याशिवाय प्रज्ञा गद्रे अाणि सिक्की रेड्डीने महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे तरुण काेना अाणि सिक्की रेड्डी जाेडीला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या बिगरमानांकित जाेडीला पहिल्याच फेरीतील पराभवाने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सायना अाणि गत कांस्यपदक विजेती सिंधू मंगळवारी हाेणाऱ्या लढतीत खेळणार अाहे.
कश्यपने ३१ मिनिटांत जिंकला सामना
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पी. कश्यपने अवघ्या ३१ मिनिटांत सलामीचा सामना जिंकला. त्याने एकेरीच्या पहिल्या फेरीत हाॅलंडच्या बिगर मानांकित एरिक मेईजसचा पराभव केला. दहाव्या मानांकित कश्यपने २१-१७, २१-१० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्याने दुसऱ्या फेरीत धडक मारली.

अॅलेक्सविरुद्ध प्रणय विजयी : भारताच्या एचएस प्रणयने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत एकतर्फी विजयाची नाेंद केली. त्याने ३१ मिनिटांत सलामीचा सामना अापल्या नावे केला. प्रणयने सलामीला ब्राझीलच्या अॅलेक्स युवानचा २१-१२, २१-१६ पराभव केला.
प्रज्ञा-सिक्की दुसऱ्या फेरीत
प्रज्ञा गद्रे अाणि सिक्की रेड्डीने भारतीय संघाला महिला दुहेरीत विजयाचे खाते उघडून दिले. या बिगर मानांकित जाेडीने सलामीच्या लढतीत जर्मनीच्या इसाबेल अाणि ब्रिगिट मिचेल्सचा पराभव केला. प्रज्ञा-सिक्कीने ५० मिनिटे शर्थीची झुंज देऊन राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्यांनी १६-२१, २१-१५, २१-१४ अशा फरकाने सामना तीन गेममध्ये जिंकला.
बातम्या आणखी आहेत...