आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राैप्यपदक विजेत्या सायनाला पुन्हा नंबर वनची संधी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पराभवानंतरही राैप्यपदक विजेत्या सायना नेहवालला पुन्हा एकदा क्रमवारीतील अव्वलस्थानी विराजमान हाेण्याची संधी अाहे. गुरुवारी वर्ल्ड बॅडमिंटनची क्रमवारी जाहीर हाेईल. सायनाला गत रविवारी वर्ल्ड चॅम्पिनयशिपच्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅराेलिना मरिनने पराभूत केले.
जगातील नंबर वन अाणि गतचॅम्पियन मरिनला या जेतेपदानंतरही ८०६१२ गुणांसह अापले सिंहासन कायम ठेवता अाले. तिला गतविजेती असल्याने क्रमवारीत एकाही गुणाचा फायदा झाला नाही. गतवर्षी क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झालेल्या सायनाने यंदाच्या स्पर्धेत फायनल गाठली हाेती. यामुळे तिला ३६०० गुणांचा माेठा फायदा झाला. त्यामुळे तिचे एकूण ८२,७९२ गुण हाेणार अाहेत.

त्यामुळे नव्या क्रमवारीत सायना ही स्पेनच्या मरिनवर कुरघाेडी करून अव्वल स्थानावर पुन्हा एकदा विराजमान हाेईल. यापूर्वी २ एप्रिल राेजी पहिल्यांदा नंबर वनचे सिंहासन काबीज केले हाेते.
८२,७९२ गुण सायनाचे हाेणार
८०६१२ गुण मरिनच्या नावे