आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा; गॅसेनोव्हा-डायना यांच्यात रंगणार फायनल! भारताच्या झील देसाईचे आव्हान संपुष्टात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रशियाची अॅनास्तेसियाने गॅसेनोव्हा व लॅटवियाची डायना मार्सिनकेविकाने जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. एकेरीत डायनाचे ३३३ तर अॅनास्तेसियाचे ३८१ मानांकन आहे. शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये दोन्ही विदेशी खेळाडू विजयासाठी प्रयत्न करतील.

कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताकडून उपांत्य फेरीत पोहोचलेली एकमेव झील देसाई (अहमदाबाद) हिचे आव्हानही संपुष्टात आले. तिने उपांत्य फेरीत रशियाच्या अॅनास्तेसियाची चांगलीच दमछाक केली. कडव्या लढतीत पहिल्या सेटमध्ये झीलने ५-३ अशी आघाडी घेतली होती. नंतर अॅनास्तेसियाने बॅकहँड व फोरहँडचे शानदार प्रदर्शन करीत झीलवर ७-५ अशी मात केली. दुसऱ्या सेटमध्येही झील ३-१ आघाडीवर होती, परंतु झीलच्या अनफोर्सड चुकीचा फायदा अॅनास्तेसियाने घेतला. या सेटमध्येही तिने ४-४, ५-५ अशी बरोबरी साधीत अखेर ७-५ असा सामना जिंकत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
दुसऱ्या उपांत्य एकेरीत लॅटवियाच्या डायनाने तैपेयीची चिह यू हसूला २-० असे सरळ दोन सेटमध्ये नमविले. पहिल्या सेटमध्ये डायनाने तिचा ६-० असा धुव्वा उडविला. दुसऱ्या सेटमध्ये चिह यू हसूने थोडाफार प्रतिकार केला, परंतु या सेटमध्येही तिने ६-३ अशी मात केली.
बातम्या आणखी आहेत...