आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेशीर लढाई करून ही पैलवान झाली DSP, आमिर आहे तिचा फॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता फोगट - Divya Marathi
गीता फोगट
चंदिगड- गत 2010 राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन महिला कुस्तीपटू गीता फोगटची मंगळवारी पोलिस उपअधीक्षकपदी (डीएसपी) नियुक्ती करण्यात आली. हरियाणा राज्य शासनाने नियुक्ती केली. याच्या प्रस्तावाला राज्याच्या कॅबिनेटने एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर नियुक्तीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली. याशिवाय गिर्यारोहक राम पालची पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याने नुकतीच गिर्यारोहनात महत्त्वाची कामगिरी बजावली. कुस्तीपटू गीता फोगटची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. यातून अनेक युवा महिला खेळाडूंना प्रेरणा मिळाली. त्याकारणाने हा नियुक्तीचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री खट्टर यांनी दिली. 2010 मध्ये मिळवले होते कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण....
- गोता फोगटने 2010 साली कॉमन वेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
- यानंतर हरियाणा सरकारने धोऱण जाहीर केले होते की, गोल्ड पदक जिंकणा-या खेळाडूला डीएसपी पदावर नोकरी दिली जाईल,
- मात्र, गीताला सरकारने फौजदार म्हणजे पीएसआय पदावर नेमले.
- त्यामुळे गीताने हायकोर्टात धाव घेतली. यानंतर कोर्टाने सरकारला आदेश दिले की दोन महिन्यात गीताला डीएसपी पदावर नियुक्ती द्यावी.
- यानंतरही सरकारने काहीही हालचाल केली नाही. यानंतर पुन्हा गीता कोर्टात गेली.
- यावेळी कोर्टाने सरकारला फटकारताना सांगितले की, आता जर खेळाडूंना प्रमोशन दिले नाही तर तो कोर्टाचा अवमान समजला जाईल. यानंतर सरकार जागे झाले.
- अखेर मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने गीतासह आणखी काही जणांना डीएसपी पदावर नियुक्ती दिली.
अमिर आहे गीताचा फॅन्स-
- अभिनेता अमिर खान पैलवान महावीर फोगट आणि त्याच्या कुटुंबांवर दंगल नावाचा चित्रपट बनवत आहे.
- खुद्द अमिर खान गीता फोगटचा मोठा फॅन आहे.
- यंदा रिओ ऑलिंपिकमध्ये गीता पोहचू शकली नव्हती.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, गीता फोगट व तिच्या कुटुंबियांचे फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...