आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीपटू हरदीपला अाॅलिम्पिकचे तिकिट, काेटा पूर्ण करणारा भारताचा तिसरा मल्ल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्ताना - याेगेश्वरपाठाेपाठ अाता दुसऱ्या दिवशी हरदीपने रविवारी रिआे अाॅलिम्पिकचा काेटा मिळवला. त्याने अाशियाई अाॅलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. यासह ताे अागामी अाॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला. अाॅलिम्पिकचे तिकीट मिळवणारा हरदीप हा तिसरा भारतीय मल्ल अाहे.
यापूर्वी नरसिंग यादव अाणि याेगेश्वर दत्तने काेटा मिळवला अाहे. तब्बल १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाला ग्रीकाे-राेमन कुस्तीमध्ये अापला प्रतिनिधी पाठवण्याची संधी मिळाली. यापूर्वी २००४ अथेन्स अाॅलिम्पिकमध्ये माैसम खत्रीने या गटात भारताचे प्रतिनिधित्व केले हाेते.
अाता भारताच्या हरदीपने पुरुषांच्या ९८ किलाे वजन गटात हे यश संपादन केले. त्याने या वजन गटातील उपांत्य लढतीमध्ये कझाकिस्तानच्या मार्गुलान अस्साम्बेकाेवला धूळ चारली. त्याने ही लढत ११-२ अशा फरकाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. अाता सुवर्णपदकासाठी भारताचा हरदीप अाणि चीनचा डी क्सिअाे यांच्यात फायनल कुस्ती रंगणार अाहे.

हरदीपने सलामीला तुर्कमेनिस्तानच्या अार्सेलवर ११-० ने एकतर्फी विजयाची नाेंद केली हाेती. यासह त्याला अंतिम चारमध्ये धडक मारता अाली.
बातम्या आणखी आहेत...