आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाडाची क्लीन चिट; नरसिंग यादव अाज कुस्ती लढणार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे - मागील दाेन महिन्यांपासून अाॅलिम्पिकमधील प्रवेशाच्या अडचणींचा सामना करणाऱ्या भारताच्या कुस्तीपटू नरसिंग यादवचा अखेर मार्ग माेकळा झाला. त्याला जागतिक डाेपिंग विराेधी संस्थेने (वाडा)दिलासा दिला. त्यामुळे त्याचा रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला अाहे.

यापूर्वी नाडानेही त्याला क्लीन चिट दिली हाेती. ताे शुक्रवारी पुरुषांच्या ७४ किलाे वजन गटाच्या सलामीला कुस्ती लढणार अाहे. त्याच्याकडून पदकाची अाशा केली जात अाहे. मात्र, दाेन दिवसांपासून कारवाईची टांगती तलवार असल्याने नरसिंगला अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी कसरत करावी लागेल. अशात त्याच्यावर पदकासाठीचेही माेठे दडपण अाहे. कारण या वजन गटातील काेटा मिळवल्याने त्याला रिअाेत खेळण्याची संधी मिळाली. यासाठी गत अाॅलिम्पिकमधील पदक विजेत्या सुशील कुमारचा दावा फेटाळण्यात अाला. यामुळे नरसिंगला अाता अापल्या वजन गटात अव्वल कामगिरी करावी लागणार अाहे. कारण, भारताचे अव्वल दाेन मल्ल हे सलामीलाच पराभूत झाले. त्यामुळे अाता पदकाची अाशा नरसिंग अाणि याेगेश्वर दत्तकडून कायम अाहे.
बातम्या आणखी आहेत...