आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांची भेट घेत नरसिंगने मानले आभार, देशाला पदक मिळवून देण्याचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मिडियाशी बोलताना नरसिंग यादव... - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मिडियाशी बोलताना नरसिंग यादव...
नवी दिल्ली- भारताचा अव्वल मल्ल नरसिंग यादवने आज सकाळी आकराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी पंतप्रधानांनीही त्याला रिओ ऑलिंपिकसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अशा घटनांतून बोध घेऊन भविष्यात दगाफटका होणार नाही काळजी घेण्यास मोदींनी नरसिंगला सांगितले. यावेळी त्याने पंतप्रधानांना आश्वस्त करताना देशासाठी मी नक्कीच मेडल आणेन असा शब्द दिला आहे. आता मला देशवासियांसाठी सुवर्णपदक जिंकावेच लागेल असेही नरसिंगने मोदींच्या भेटीनंतर सांगितले. दुसरीकडे, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी नरसिंग कटकारस्थानाचा बळी ठरला होता असे सांगत त्याला सरकारच्या वतीनेही क्लीन दिली आहे.
रिओला लवकरच जाणार
- मल्ल नरसिंग यादव डोपिंगच्या आरोपांतून मुक्त झाला आहे. नाडाकडून क्लीन चिट मिळाल्याने नरसिंगचा रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागाचा मार्ग सुकर झाला आहे.
- वादावर पडदा पडल्यानंतर नरसिंग म्हणाला, अखेर सत्याचाच विजय झाला. मी निष्कलंक ठरेन, यावर विश्वास असल्याने सराव करणे सोडले नव्हते.
- नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी तपास आयोगाचा निकाल सुनावताना सांगितले की, नकळत प्रतिबंधित औषध घेतल्याचे नरसिंगला माहीत नव्हते.
- यामुळे त्याच्याविरुद्ध कट रचण्यात आल्याच्या दाव्याला दुजोरा मिळतो.
- सराव करताना खाण्यापिण्याच्या गोष्टींवर नजर ठेवणे अशक्य आहे. यामुळे असे प्रकार खेळाडूचे अपयश आहे, असे समजले जाऊ शकत नाही.
- ऑलिम्पिकमध्ये प्रवीण राणाऐवजी नरसिंगला संधी दिली जावी, अशी विनंती भारतीय कुस्ती महासंघाने आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेला केली आहे. त्यांची परवानगी मिळताच तो रिओला रवाना होईल.
यामुळे 5 बाबींमुळे सुटला नरसिंग-
- नरसिंगने चूक केली नाही, ना निष्काळजीपणा केला. तो प्रतिस्पर्ध्याच्या कटाचा बळी ठरला.
- 2 जूनपूर्वी नरसिंगचा एकही नमुना पॉझिटिव्ह आढळला नव्हता.
- नरसिंगवर सेवनाचा आरोप असलेले मेथॉयडिएनोन हे प्रतिबंधित औषध वजन वाढण्यासाठी घेतले जाते. त्याचे वजन 81 किलो आहे आणि त्याला खेळायचे होते 74 किलो वजनी गटात.
- अशा स्थितीत ऑलिम्पिकच्या तोंडावर एखादा खेळाडू वजन वाढवणारे उत्तेजक का घेईल?
- नरसिंगचा रूम पार्टनर संदीपही डोपिंगमध्ये अडकला होता. त्याला तर जवळच्या काळात कोणत्याही स्पर्धेत खेळायचे नव्हते. तो तर नरसिंगचा सराव करवून घेत होता.
कुस्ती महासंघ व नंतर सरकारचीही साथ-

- नरसिंगचा खासगी खानसामा चंदन व विनोद व राजेश या सोनिपतच्या साई सेंटरचे मेस कर्मचाऱ्यांच्या जबाबानुसार नरसिंगच्या जेवणात काहीतरी मिसळण्यात आले होते. भाजीतून फेस आल्यामुळे ती फेकावी लागली होती.
- नरसिंगला रोखण्याचे कसे कसे प्रयत्न झाले हे कुस्ती महासंघाने आपल्या अहवालात नाडाला कळवले होते. पीएमओ, क्रीडा मंत्रालयानेही नरसिंगची साथ दिली. तो जर दोषी असता तर असे झाले नव्हते.
- नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशन (नाडा) या संस्थेने कुस्तीपटू नरसिंग यादव याला उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषमुक्त केल्याने आनंद झाला. तो कटकारस्थानाचा बळी ठरला होता याची माहिती मिळाल्याचे त्याच्या पाठीशी उभे राहिलो असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत नाडाच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले.

पुढे स्लाईड्समध्ये पाहा, नरसिंग यादव डोपिंग प्रकरणाबाबतची अपडेट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...