आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला भिडलाय हा पैलवान, रोज फस्त करतो 30 चपात्या, 3 Kg चिकन अन् 20 अंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजपाल हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील एका शेतकरी कुंटुंबातील आहे. - Divya Marathi
राजपाल हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील एका शेतकरी कुंटुंबातील आहे.
झज्जर (हरियाणा)- ईदच्या मुहूर्तावर बुधवारी सलमान खानची फिल्म सुल्तान रिलीज झाली. या फिल्ममध्ये रोहतकमधील मेहर सिंह आखाड्यात सराव करणारा राजपाल ऊर्फ राजू पैलवानला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. राजपाल या फिल्ममध्ये सलमानला भिडलेला दाखवलेला आहे. फिल्म रिलीज झाल्यानंतर राजपालने 'दैनिक भास्कर'शी संवाद साधला.
कोण आहे हा पैलवान-
- राजपाल हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील एका शेतकरी कुंटुंबातील आहे.
- त्याचे शालेय शिक्षण झज्जरमधील सरकारी शाळेत झाले.
- राजू हरियाणातील सर्वात उंच पैलवानांपैकी एक आहे.
- त्याची उंची 6 फुट 9 इंच आहे तर वजन 140 किलोग्राम आहे.
- राजूच्या रोजच्या डाईटमध्ये 6 किलो दूध, 3 किलो चिकन, 4 डझन केळी, 30 चपात्या आणि 20 अंड्यासोबत प्रोटीन आणि ज्यूसचा समावेश आहे.
- राजपालने सांगितले की, तो दिवसभरातील 3 ते 5 तास आखाड्यात सराव करतो.
अशी संधी मिळाली सुल्तानमध्ये काम करण्याची-
- फेब्रुवारी महिन्यात सुल्तान फिल्मशी संबंधित काही लोक मुंबईतून रोहतक आखाड्यातील पैलवानांना पाहण्यासाठी आले होते.
- त्यांनी राजू पैलवानाला पाहताच सलमानसोबत कुस्ती करण्यासाठी त्याला निवडले होते.
- राजूला मार्चमध्ये मुंबईतील गोरेगाव येथे बोलावले होते. जेथे आणखी सात पैलवान पोहचले होते.
- त्याची उंची आणि शरीर पाहून फिल्म सुल्तानमधेये सलमानशी कुस्ती लावण्यासाठी त्याची निवड केली.
- राजपाल म्हणाला की, या फिल्मच्या शूटिंगदरम्यान त्याने अनेकदा सलमानसोबत कुस्ती खेळली.
- राजपाल सध्या एका हरियानवी फिल्ममध्ये काम करीत आहे.
कसा बनला पैलवान-
एका मुलाखती दरम्यान राजपालने सांगितले की, मी मोठ्या भावासमवेत कुस्ती खेळायला लागलो.
- एकदा भावाला कुस्ती खेळताना दुखापत झाली आणि त्याने कुस्ती सोडण्याचा निर्णण घेतला. तेव्हाच मी कुस्ती खेळण्याचा निर्धार केला.
- राजूने सांगितले की, त्याचे आजोबा गावातील नामांकित पैलवान होते व ते कुस्तीचे प्रशिक्षण देत असे.
- राजू सध्या रोहतकमधील मेहर सिंह आखाड्यात सराव करतो.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, राजपाल ऊर्फ राजू पैलवानचे काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...